रोटरी-होरायझन पुरस्कार

रोटरी-होरायझन पुरस्कार

90348
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझनतर्फे विविध सामाजिक पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी रोटरी पदाधिकाऱ्यांसह पुरस्कारविजेते.

‘रोटरी-होरायझन’तर्फे
पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर, ता. २० : रोटरी क्लब ऑफ होरायझनतर्फे विविध सामाजिक पुरस्कारांचे वितरण झाले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपण समाजाचे काही देणे लागतो, हे मनाशी ठरवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात समाजाची सेवा करावी, अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ‘रोटरी’तर्फे विविध सामाजिक पुरस्कार दिले जातात. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे या वेळी देशपांडे यांनी सांगितले.
आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचे क्रीडाशिक्षक पौलस ऊर्फ पॉल सूर्यवंशी, आंतरभारती शिक्षण मंडळाच्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे क्रीडाशिक्षक राजेंद्र बनसोडे यांना नेशन बिल्डर अवॉर्डने गौरवण्यात आले. एनआयएस सायकलिंग कोच अक्षय कारेकर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शववाहिकेवर सारथ्य आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी प्रिया पाटील, पांजरपोळ संस्थेचे डॉ. राजकुमार बागल यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डने गौरवण्यात आले. असिस्टंट गव्हर्नर प्रवीण कुंभोजकर यांनीही शुभेच्छा दिल्या. या वेळी अजितकुमार कोष्टी यांचा एकपात्री हास्य प्रयोगाचा कार्यक्रम झाला. रोटरी होरायझनचे अध्यक्ष संजय साळोखे, सचिव सागर बकरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com