Wed, June 7, 2023

इचलकरंजीत उद्या शोभायात्रा
इचलकरंजीत उद्या शोभायात्रा
Published on : 20 March 2023, 4:36 am
इचलकरंजीत उद्या शोभायात्रा
इचलकरंजी : येथे गुढीपाडवा, अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले आहे. शोभायात्रेत केसरी ढोल पथक, पुण्याचे रमणबाग युवा मंच ढोल-ताशा पथक आणि सांगलीचे विसावा मंडळ यांचे लेझीम पथक यांचा सहभाग असणार आहे. यासोबत अनेक देखावे सादर होणार आहेत.
शोभायात्रा शिवतीर्थपासून सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून सांगता महात्मा गांधी पुतळा येथे होणार आहे. शोभायात्रेत युगंधरा फाउंडेशन छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा, रुद्राक्ष ॲकॅडमी मर्दानी खेळ, प्रभू श्री रामचंद्रांचा भव्य रथ, महेश आर्ट अँड आयडिया यांच्याकडून सुबक, सुंदर, रंगांची भव्य रांगोळी, शिवरायांच्या आरमाराचा देखावा असणार आहे. रील्स स्पर्धेचे आयोजनही केल्याची माहिती शोभायात्रा उत्सव कमिटीचे श्रुती सर्वेश फाटक, आशुतोष नागवेकर यांनी दिली.