बाजार समिती

बाजार समिती

बाजार समित्यांची अंतिम यादी जाहीर

पुढच्या महिन्यात रणधुमाळी ः नव्या ग्रामपंचायत, विकास सोसायटी सदस्यांची नावे समाविष्ट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० ः कोल्हापूरसह गडहिंग्लज व जयसिंगपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित अंतिम मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली. मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने पुढील महिन्यात या तिन्हीही बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
यापूर्वी या तिन्हीही बाजार समित्यांची प्रारूप यादी प्रसिध्द होऊन त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार हरकतीवरील सुनावणीही झाली. पण त्यानंतर जिल्ह्यातील ४३८ ग्रामपंचायतींच्या व काही विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाला. या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची नावे नव्याने या यादीत समाविष्ट करावी लागणार होती. त्यासाठी संबंधितांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. या हरकती आल्यानंतर संबंधितांच्या नावांच्या समावेशासह आज अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.
कोल्हापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र साडे सहा तालुक्यात आहे. त्यात करवीरसह पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड व गगनबावडा हे पूर्ण तर कागल तालुक्याचा अर्धा भाग समाविष्ट आहे. कागल तालुक्यातील उर्वरित भागासह आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्याचे कार्यक्षेत्र गडहिंग्लज बाजार समितीत येते. जयसिंगपूर बाजार समिती शिरोळ तालुक्यापुरती मर्यादित आहे.
आज सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर पंधरा दिवसांत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाते. आजच या निवडणुकीचा आढावा ऑनलाईन बैठकीद्वारे घेण्यात आला. त्यात येत्या एक-दोन दिवसांत निवडणुकीबाबत स्पष्टता होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार पुढील महिन्यात या तिन्हीही बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
............

शेतकरी मतदानापासून वंचितच

बाजार समितीच्या निवडणुकीत दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मतदान आणि उमेदवारीचा अधिकार देण्यात आला. पण यावेळच्या निवडणुकीत अशा शेतकऱ्यांना फक्त निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येणार आहे, मतदानाच्या अधिकारांपासून मात्र हे शेतकरी वंचित रहाणार आहेत. या निवडणुकीत एखाद्या शेतकऱ्याने उमेदवार म्हणून अर्ज भरला तर त्याला स्वतःचेही मत मिळणार नाही.
.........

समितीनिहाय सभासद असे
बाजार समिती विकास सोसायटी ग्रामपंचायत अडते हमाल एकूण
कोल्हापूर १४१३१ ५७३३ १२०७ ८९४ २१,०७५
गडहिंग्लज ४८९५ २७२९ ६९७ १४७ ८,४६८
जयसिंगपूर १९१० ६६८ ३५९ ८७ ३,०२१
................

कोल्हापूर बाजार समितीचे तालुकानिहाय सभासद
तालुक्याचे नाव सोसायटी ग्रामपंचायत
संस्था मतदार संख्या मतदार
करवीर २५२ ३११० ११८ १३३३
पन्हाळा २४७ ३०३० १११ १०३०
राधानगरी १९९ २३१७ ९८ ९१२
भुदरगड २०५ २४०४ ९७ ८२२
शाहुवाडी ९९ १२१६ १०६ ९२७
कागल १०५ १२७६ ४४ ४६९
गगनबावडा ६८ ७८० २९ २४०
...........................................................................................
एकूण ११७५ १४,१३३ ६०३ ५७३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com