पत्रके अन्‌ पत्रके बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके अन्‌ पत्रके बातम्या
पत्रके अन्‌ पत्रके बातम्या

पत्रके अन्‌ पत्रके बातम्या

sakal_logo
By

शहाजी महाविद्यालयास
गुरुवारी नॅक समितीची भेट
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती (नॅक) समिती गुरुवारी (ता. २३) भेट देऊन मूल्यांकन करणार आहे. महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालकांशी समिती संवाद साधणार आहे. महाविद्यालयातील सर्व घटकांनी या मूल्यांकन प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले आहे. या समितीचे अध्यक्ष मोतीहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजीव कुमार शर्मा हे असून, सदस्य म्हणून कर्नाटक येथील दयानंद सागर युनिव्हर्सिटीचे डॉ. सुनील मोरे, डी. के. गव्हर्न्मेंट कॉलेज नेलोरे येथील (आंध्र प्रदेश) माजी प्राचार्य डॉ. मसथानीह छपारपू हे महाविद्यालयाची पाहणी करणार आहेत. ‘नॅक’च्या अनुषंगाने महाविद्यालयातील सर्व विभागांनी पूर्ण तयारी केली आहे. गुरुवार, शुक्रवारी दोन दिवस ही मूल्यांकन प्रक्रिया सुरू राहणार आहे.
----------------
90370 सदानंद डिगे, 90371 जयसिंग पाडळीकर

मध्यवर्ती जयंती महोत्सवाचे सदानंद डिगे अध्यक्ष
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, डिगे फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सदानंद डिगे यांची एकमताने निवड झाली. २०२३-२४ करिता कार्यकारिणी निवडीसाठी मिस क्लार्क येथे बैठक झाली. बैठकीत डिगे यांची निवड जाहीर केली. समितीच्या सचिवपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांच, तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब काळे (आरपीआय), उपाध्यक्षपदी बाजीराव गायकवाड, प्रवीण आजरेकर, सहसचिवपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे यांची निवड केली. उर्वरित कार्यकारिणी पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल, असे बैठकीत ठरविले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. विजय काळेबाग होते. डिगे यांनी प्रा. डॉ. काळेबाग यांनी जाहीर केलेल्या १०१ व्याख्यानमालेचा संकल्प येत्या वर्षात पूर्णत्वास नेणार असल्याचे जाहीर केले. जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानमालेसह बिंदू चौक सुशोभित करण्याचा संकल्प करत विविध कार्यक्रम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समितीवर मार्गदर्शक म्हणून ‘रिपाईं’चे (आठवले गट) संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, दगडू भास्कर, रुपाताई वायदंडे, बाळासाहेब भोसले, प्रा. डॉ. काळेबाग, प्रा. डॉ. शरद गायकवाड, जयसिंग जाधव, सुभाष देसाई, बाजीराव नाईक, टी. एस. कांबळे, पांडुरंग कांबळे मार्गदर्शक आहेत. बैठकीस गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर, प्रदीप मस्के, नीलेश बनसोडे, नामदेव कोथळीकर, बाबासाहेब धनगर, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------
राजेबागस्वार दर्गा उरूस आजपासून
कोल्हापूर : शनिवार पेठ येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे राजेबागस्वार साहेब दर्ग्याचा उरूस साजरा होणार असून, मंगळवारी (ता. २१) रात्री आठ वाजता गंध चढवणे कार्यक्रम होईल. बुधवारी (ता. २२) उरूस आणि संध्याकाळी गलेफ मिरवणूक रात्री नऊ ते साडेदहा वेळेत होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नजीर आब्बास फकीर (मकानदार) यांनी केले आहे.
--------------
गोखले महाविद्यालयात कार्यशाळा
कोल्हापूर : गोखले महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ डी. आर. के. अग्रणी कॉलेजअंतर्गत ‘अनुवाद क्षेत्रामधील भाषांचे योगदान’ या विषयावर कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. डॉ. पाटील त्यांनी वर्तमान युगामध्ये अनुवाद क्षेत्र व्यापक होत असून, रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. कथा, कादंबरी, नाटक अशा साहित्य कृतीच्या अनुवादातून अर्थार्जन मिळवणेची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे, असे मत व्यक्त केले. कार्यशाळा तीन सत्रात झाली. डॉ. गोपाळ गावडे, डॉ. आर. आर. थोरात यांनी अनुवाद क्षेत्रामधील भाषांचे योगदान, संधी व अडचणी मांडल्या. प्रा. जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, दौलतराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सी. आर. चौगुले यांनी स्वागत केले. डॉ. आर. बी. पोवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. के. पाटोळे यांनी आभार मानले. प्रा. आर. बी. मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. एच. पाटील यांनी संयोजन केले. प्रा. ए. बी. गवळी, प्रा. एस. आर. नदाफ, सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
-----------

ई.पी.एफ.ओ. पेन्शन
अर्जांच्या तारखेत वाढ
कोल्हापूर : ‘ई.पी.एफ.ओ.’ने उच्च वेतनावरील पेन्शनच्या अर्जांची तारीख वाढवली, अशी माहिती क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त (पेन्शनर) अमित चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकातील माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते की, एक सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) १९९५ चे असे सदस्य ज्यांनी परिच्छेद ११ (३) अंतर्गत त्यांच्या निवृत्तीपूर्वी पर्याय वापरला होता. ते वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील. यासंदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या क्षेत्रीय कार्यालयांना २९ डिसेंबर २०२२ आणि पाच जानेवारी २०२३ च्या परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या होत्या. एक सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि निवृत्तीपूर्वी संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन सुविधा ‘ईपीएफओ’च्या संकेतस्थळावर तीन मार्च २०२३ पर्यंत दिली होती. आता कर्मचारी, मालक संघटनांच्या मागणीनुसार, केंद्रीय विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, कर्मचारी भविष्य निधी संघटन यांनी अशा कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदत तीन मेपर्यंत वाढविली आहे. यासाठीचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.----------------
90385 विठ्ठल आंबले, 90386 डॉ. प्रशांत पाटील

विठ्ठल आंबले अध्यक्षपदी
कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी विठ्ठल आंबले, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप शिंदे यांनी काम पाहिले. नूतन संचालक मंडळ, सेवक उपस्थित होते.
---------------
90388
कोल्हापूर : कलामंदिर महाविद्यालयात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषक देताना उपस्थित मान्यवर.

कलामंदिर महाविद्यालयातील
चित्र शिल्प प्रदर्शनाचा समारोप
कोल्हापूर : कुमावत सेवा संघ संचालित कलामंदिर महाविद्यालयाचे वार्षिक चित्र-शिल्प प्रदर्शनाचा समारोप पापाची तिकटी येथे झाला. ‘नाबार्ड’चे महाप्रबंधक आशुताष जाधव म्हणाले, ‘‘आपल्या आसपासच्या हस्तकला कलाकारास मदत केली पाहिजे. तसेच त्यासाठी प्रशिक्षण शिबिरास मदत करण्यात येईल.’’ त्यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. राणोजी चव्हाण उपस्थित होते. मारुतराव कातवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी माजगांवकर यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविले. यामध्ये अंकिता जैन, आर्या गोंदकर, केवल सावंत, अनिकेत कुंभार, अमरदीप कुंभार, यश कातवरे, स्वाती लोंखडे, भाग्यश्री करपे, अर्चना कुंभार, रीतुजा दोशी, रुक्मिणी राठोड, रथश्री कोलते, सार्थक खेडेकर, अनिकेत सुतार, अविनाश कुंभार यांचा समावेश होता. मयूर कोळी, अनुजा शेटे, प्रा. योगेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय कुंभार यांनी आभार मानले. संजय निगवेकर, डॉ. डी. डी. वागवेकर, सर्जेराव निगवेकर, राजेंद वागवेकर, प्राचार्य किशोर पुरेकर, चित्रकार मोहन वडणगेकर, विजय कुंभार, रवींद्र वागवेकर, विद्यार्थी उपस्थित होते.
-------------
‘सम्राट हर्षवर्धन’च्या शाखेचे उद्‌घाटन
कोल्हापूर : पांजरपोळ मेन रोड येथे सम्राट हर्षवर्धन भारतीय सेनेच्या पांजरपोळ शाखा नंबर दोनचे उद्‌घाटन धोंडीराम जावळे यांच्या हस्ते झाले. सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेत किरण लाखे उत्तीर्ण झाल्याबद्दल या वेळी बाजीराव नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. साई लाखे यांच्या हस्ते प्रभाकर जावळे, काकासाहेब माने यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष रणजितसिंह औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रशांत अवघडे यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी स्वागत केले. दाद शिंदे, नरेश चिकोर्डे, अरुण कवाळे, भिकाजी सोनटक्के, महादेव कोरे, महादेव सोनटक्के, महेश कांजर, विनोद डावाळे, युवराज मोडीकर, राजू सोनटक्के, विजय तडाखे, भारत मोरे, सतीश रास्ते, देवेंद्र कांबळे, आण्णा तिळवे, अजित देवकुळे, नितीन पाटील, दाविद भोरे आदी उपस्थित होते.