
नामदेव गावडे स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
कॉम्रेड गावडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
उद्या स्मृतिजागर, स्मरणिकेचे प्रकाशन
---
कसबा बीड येथे कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर, ता. २१ : कॉम्रेड नामदेव गावडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (ता. २३) त्यांचा स्मृतिजागर, स्मरणिकेचे प्रकाशन, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कसबा बीड (बीड शेड) (ता. करवीर) येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी दहाला होत आहे, अशी माहिती नामदेव गावडे स्मृतिजागर समितीचे सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, नामदेव गावडेप्रेमी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
कांबळे म्हणाले, की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे कार्यक्रमास अध्यक्षस्थानी असतील. गावडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी लिहिलेल्या गौरवपर लेखांचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील प्रमुख उपस्थित असतील. या वेळी चळवळीत काम केलेल्या दिलीप पवार, राम कळंबेकर, बी. एल. बरगे, सुमन पाटील, दिनकर सूर्यवंशी, शांताबाई जाधव, बाळू राऊ पाटील, हणमंत लोहार, नामदेव पाटील, भिकाजी कुंभार, श्रीमती सुनंदा खाडे, शिवाजी तळेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. एकनाथ पाटील, उत्तम वरुटे, बाळासाहेब खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, नामदेव चव्हाण, राम बाहेती, दादासो लाड, जालंधर पाटील, सत्यजित पाटील, श्रीमती सुमन नामदेव गावडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. स्मरणिकेचे संपादन अनिल चव्हाण, प्रशांत आंबी यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला दिनकर सूर्यवंशी, बी. एल. बरगे, मारुती नलवडे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, बाबा ढेरे, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.
....................