अंबाबाई भाविकांसाठी कापडी पिशव्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई भाविकांसाठी कापडी पिशव्या
अंबाबाई भाविकांसाठी कापडी पिशव्या

अंबाबाई भाविकांसाठी कापडी पिशव्या

sakal_logo
By

90353
...

अंबाबाई भाविकांसाठी
दहा हजार कापडी पिशव्या

कोल्हापूर ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांसाठी येथील डाक विभागातर्फे दहा हजार कापडी पिशव्या देण्यात आल्या. विभागातर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्याकडे या पिशव्या सुपूर्द करण्यात आल्या. अंबाबाई दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यावेळी त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापराव्यात, असे आवाहन केले जाते. त्यातीलच एक कृतीशील पाऊल म्हणून डाक विभागातर्फे पिशव्या दिल्या जातात. डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे, देवस्थान समितीच्या सहाय्यक सचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी यावेळी उपस्थित होते.