मुश्रीफ वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ वाढदिवस
मुश्रीफ वाढदिवस

मुश्रीफ वाढदिवस

sakal_logo
By

90362
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील. या वेळी प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस
लोकोत्सव म्हणून साजरा करू
ए. वाय. पाटील; ३० ला गावागावांत महाआरती
कोल्हापूर, ता. २० : राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचा ३० मार्च रोजी होणारा वाढदिवस जिल्हाभर लोकोत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. रामनवमीदिवशी ३० मार्चला सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील सर्वच गावांमधील ग्रामदैवतांना अभिषेक, महाआरतीसह विविध विधायक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी जिल्हा बँकेत आयोजित प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘हसन मुश्रीफ यांनी गेल्या ३५-४० वर्षांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे आणि गोरगरिबांचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत, हे महाराष्ट्रासह देशाला दाखवून देऊया.’’
रामनवमी दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरात अभिषेक, महाआरती करून मुश्रीफ यांच्यावरील संकट दूर करून त्यांना सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करूया, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. या वेळी आमदार राजूबाबा आवळे, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतिश पाटील, माजी महापौर आर. के. पोवार आदींची भाषणे झाली.
बैठकीला ‘गोकुळ’ चे संचालक युवराज पाटील, ‘केडीसीसी’ चे संचालक संतोष पाटील, माजी संचालक आसिफ फरास, बी. के. चव्हाण, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, मनोज फराकटे, दत्ता पाटील, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, युवराज वारके, धनराज घाटगे, धैर्यशील पाटील -कौलवकर, प्रकाश गवंडी, संतोष मेंगाणे, राजेंद्र पाटील, शाहू काटकर उपस्थित होते. प्रताप उर्फ भैया माने यांनी स्वागत केले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल साळोखे यांनी आभार मानले.