शिवाजी विद्यापीठ, पुणे, नांदेड संघ उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ, पुणे, 
नांदेड संघ उपांत्य फेरीत
शिवाजी विद्यापीठ, पुणे, नांदेड संघ उपांत्य फेरीत

शिवाजी विद्यापीठ, पुणे, नांदेड संघ उपांत्य फेरीत

sakal_logo
By

लोगो - आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धा

शिवाजी विद्यापीठ, पुणे,
नांदेड संघ उपांत्य फेरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यात आज प्रतिस्पर्धी संघांवर मात करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजी विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संघांनी सरासरीच्या बळावर उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
स्पर्धेत आज आठव्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावर पाच धावांनी विजय मिळविला. जळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सोलापूर विद्यापीठ संघाने २० षटकांत ९ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अवघ्या ५ धावांनी गमावला. जळगावचे जितेंद्र पाटील ‘सामनावीर’ ठरले. दुसऱ्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला पराभूत केले. पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना परभणीचा संघ १३.१ षटकांत सर्वबाद १०९ धावांच करू शकला. पुण्याचे दीपक गजरमल ‘सामनावीर’ ठरले. दरम्यान, उद्या (ता. २१) उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. सकाळी ९ वाजता मुंबई विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पहिला सामना होईल. दुपारच्या सत्रात दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना गुरुवारी (ता. २३) सकाळच्या सत्रात आणि अंतिम लढत दुपारच्या सत्रात होईल.