थकीत देय रक्कमांबाबत निर्णय घ्या

थकीत देय रक्कमांबाबत निर्णय घ्या

ajr201.jpg
90374
गवसे (ता. आजरा) ः येथे आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांना इंद्रजीत देसाई, तानाजी देसाई आदिंनी निवेदन दिले.
---------------
थकीत देय रक्कमांबाबत निर्णय घ्या
स्वाभीमानीतर्फे आजरा कारखाना अध्यक्षांकडे मागणी; आंदोलनाचा इशारा
आजरा, ता. २१ ः आजरा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या थकीत देय रक्कमांबाबत आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांना निवेदन दिले. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, २०१७-१८ मध्ये ५०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांची देय रक्कम ९ कोटी ४७ लाख ४८ हजार आहे. १ लाख ८९ हजार ४९६ टनाची थकीत देय रक्कम आहे. तसेच २०१८-१९ मधील थकीत एफआरपीच्या व्याजाची रक्कम २ कोटी ७६ ६१ हजार ६३९ रुपये इतकी आहे. या रकमा २०१९ ते २० या ताळेबंदामध्ये अनुक्रमे ऊस बिल देय रक्कम व एफआरपीवरील व्याज देय रक्कम या दिसत होत्या. २०२०-२१ च्या ताळेबंदातून देय रक्कम कमी करून ताळेबंदात इतरत्र दाखवल्या आहेत. ही माहिती २९ सप्टेंबर २०२२ च्या सभेत संचालक मंडळाने केलेली फेरफार ही मान्य केली असून त्याला सर्वसाधारण सभेत सभासदांकडून विरोध केला. या रक्कमा पूर्ववत शेतकऱ्यांचे देणे म्हणून ताळेबंदाला दाखवाव्यात अशा पद्धतीने ठराव घेतला आहे. त्या अनुषंगाने या रक्कमा ताळेबंदामध्ये शेतकरी देणे दाखवून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग कराव्यात. मार्च अखेरपर्यंत ही देय रक्कम द्यावी अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.
संघटनेचे जिल्हा सदस्य तानाजी देसाई, तालुका अध्यक्ष इंद्रजीत देसाई, कृष्णा पाटील, श्रीपती गुरव, श्रीकांत कळेकर, चंद्रकांत कुंभार, निवृत्ती कांबळे, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक, कार्यकारी संचालक डॉ. तानाजी भोसले हेही उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com