‘ट्रॅफिक’चा दंड कोण भरणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ट्रॅफिक’चा दंड कोण भरणार ?
‘ट्रॅफिक’चा दंड कोण भरणार ?

‘ट्रॅफिक’चा दंड कोण भरणार ?

sakal_logo
By

दंड केला, पण आम्ही नाही भरला!
‘ट्रॅफिक’च्या दंडाची थकबाकी कोटीत; विभागाला आधार लोक अदालतीचाच
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहनधारकांना केला जाणारा दंड वाहनधारक वर्षेनुवर्षे भरत नाहीत. त्यामुळेच कोट्यवधींची दंड भरणा अद्याप सरकार दरबारी झालेला नाही. आर्थिक वर्षाखेर याची माहिती घेतली असता २०२१ मध्ये दोन कोटींहून अधिक, २०२२ मध्ये अडीच कोटी, तर यावर्षी तीन महिन्यात साठ लाख रुपयांचा दंड वाहनधारकांनी भरलाच नाही. त्यामुळे वाहतूक शाखा (ट्रॅफिक) चा दंड कोण भरतोय ! अशीच स्थिती आजच्या घडीला दिसू येत आहे.
तिब्बल सीट, सिग्नल चुकविणे, विना परवाना वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे, गतीने वाहन चालविणे, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणे यासह अन्य कारणावरून पोलिसांकडून संबंधित वाहन धारकांना दंड केला जातो. अनेक वेळा प्रत्यक्षात वेळीच दंड आकारणे शक्य होत नाही. किंबहुना काही वेळा सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड केला जातो. या दंडांची माहिती संबंधित वाहनधारकाला ऑनलाईन किंवा घरी पोस्टाने मिळते. मात्र त्यावर केंव्हापर्यंत दंड भरला पाहिजे, याबाबत कोणताही उल्लेख नसतो. त्यामुळे तो तातडीने भरावा, असे गृहीत असते. तरीही वाहनधारकांची दंड भरण्याची मानसिकताच नसल्याचे वाहतूक शाखेच्या आकडेवारीवरून दिसून येते.
--------
ंचौकट
दंडाची कोटीची उड्डाणे.. गुन्हेही हजारात...
२०२१ ला ८९ हजार २१५ गुन्ह्यातील दोन कोटी ११ लाख, ११ हजार ३०० रुपये अद्याप भरले गेले नाहीत. एवढंच नव्हे तर २०२२ ला ३८ हजार १४० गुन्ह्यातील दोन कोटी ४५ लाख ४६ हजार ४००, तर २०२३ मधील आजअखेर नऊ हजार ४०६ गुन्ह्यातील ६० लाख २१ हजार ४५० रुपयांचा दंड अद्याप सरकारदरबारी भरला केला नाही.
--------------
कोट
नियमबाह्य संबंधित वाहन चालकांना नोटीस पाठवून लोक अदालतीवेळी बोलविले जाते. तेथे त्यांच्‍याकडून दंडाच्या रक्कमेची वसुली केली जाते. तसेच ठिक ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडाची आकारणी केली जाते. ज्यांच्याकडून दंडाची आकारणी होत नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रीया केली जाते.
- मनोज पाटील, पोलिस उपनिरिक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा
---------------
वर्ष*एकूण गुन्हे* एकूण रक्कम*दंड भरलेल्यांची संख्या*भरलेल्या दंडाची रक्कम*दंड न भरलेल्यांची संख्या*दंड न भरलेली रक्कम
२०२१*१,७७०५९*३,८२,१८,५५०*७८८६३*१,७१,०७,२५०*८९२१५*२,११,११,३००
२०२२*५२६१७*३,२७,२८,२५०*१४४७७*८१,८१,८५०*८१४०*,४५,४६, ४००
२०२३ (मार्च १८ अखेर*२७९२*७,२८, ४५०*३८६*७,०७,०००*४०६*६०,२१, ४५०
--------------------