सोन्याचे दागिने लंपास

सोन्याचे दागिने लंपास

पोलिस असल्याचे
सांगून दागिने लंपास

गडहिंग्लजमधील प्रकार ः गजबजलेल्या चौकातच घडलेल्या घटनेने खळबळ


गडहिंग्लज, ता. २० : पोलिस असल्याची बतावणी करुन एलआयसी शाखेतील एका कर्मचाऱ्या‍ची आज फसवणूक झाली. त्यांच्याकडील २ तोळे २ ग्रॅम वजनाची सोन्याची एक चेन व दोन अंगठ्या अज्ञातांनी लंपास केल्या. पावणे दोनच्या सुमारास वीरशैव चौकात ही घटना घडली. विलास पवार (५९) असे फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्या‍चे नाव आहे. गजबजलेल्या चौकातच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पवार हे येथील एलआयसीच्या शाखेत वरिष्ठ सहायक म्हणून सेवेत आहेत. दुपारपर्यंत काम करुन वैयक्तिक कामासाठी त्यांनी अर्ध्या दिवसाची रजा टाकून ते पैसे काढण्यासाठी एका बँकेच्या एटीएमला आले. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या हेल्मेटधारी अज्ञाताने त्यांना हाक दिली. त्याचठिकाणी तोंडाला रुमाल बांधून व पाठीला बॅग अडकवून पायी जाणाऱ्या‍लाही त्याने बोलावले. त्याला बाजूला घेवून त्याने त्याच्याशी बातचीत केली. त्यानंतर मोटारसायकलस्वाराने पवार यांना बसवेश्‍वर पुतळ्याकडे नेऊन सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून खिशातून रुमाल काढण्यास सांगितले. त्यानंतर पवार यांच्याकडील मोबाईल, एटीएम कार्ड, हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या, चेन काढून घेतल्या व त्या वस्तू रुमालात बांधून पवार यांना दिल्या व तेथून तो दुसऱ्या त्या अज्ञाताला घेवून बसस्थानकाकडे निघून गेला. पवार यांनी त्यानंतर एटीएम कार्ड काढण्यासाठी रुमालाची गाठ सोडली तर त्यात सोन्याच्या अंगठ्या व चेन नव्हती. तेंव्हा पवार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास उपनिरीक्षक शितल सिसाळ करीत आहेत.
...


* सीसीटीव्हीत कैद, पण...

संबंधित अज्ञात दोघेही बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पण, एकाने हेल्मेट व दुसऱ्याने रुमाल बांधल्याने त्यांचे चेहरे दिसत नाहीत. मोटारसायकलचा क्रमांकही दिसत नाही. यामुळे पोलिसांसमोर अज्ञातांच्या तपासाचे आव्हान आहे. हेल्मेट घातलेला अज्ञात पांढरा शर्ट, काळी हाफ जॅकेट, निळी जीन्स व पायात पांढरे बूट घातलेला आपे. तर दुसऱ्या अज्ञाताने पांढरा शर्ट, ग्रे रंगाची पँट परिधान केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com