धरणग्रस्त

धरणग्रस्त

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
उभारणार प्रकल्पग्रस्त गुढी

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कोल्हापूर, ता. २० : चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन आज २२ व्या दिवशीही सुरु राहिले. दरम्यान, बुधवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच गुढी उभारुन गुढीपाडवा सण साजरा करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांनी दिली. तर, शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या स्मृतीदिनानमित्त गुरुवारी (ता. २३) आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला आज बावीस दिवस पूर्ण झाली. तरीही प्रशासन आणि सरकारने याची ठोसपणे दखल घेतलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे कारण पुढे करत प्रकल्पग्रस्तांकडे कानाडोळा केला जात आहे. आतापर्यंत केवळ आश्‍वासनांशिवाय काहीही मिळालेले नाही. सरकार आणि प्रशासनाने यावर वेळीच तोडगा काढला असता तर प्रकल्पग्रस्तांना आपल्या घरी जावून गुढीपाडवा सण साजरा करता आला असता. पण असे झाले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच प्रकल्पग्रस्तांची गुढी उभारली जाणार आहे. शेतकरी आंदोलन, महिलांना पन्नास टक्के एसटी भाड्यात सवलत देणाऱ्या सरकारने प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. यावेळी डी. के. बोडके, नजीर चौगुले, रफिक पटेल, भगवान काळे, जगन्नाथ कुडतुडकर, विनोद बडदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com