
मारहाण
मुलांच्या भांडणातून एकास मारहाण
कोल्हापूर ः लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. जखमीने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल सखाराम सातपुते (रा. बहिरेश्वर, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. याबाबतची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले, की वेताळ चौक, बहिरेश्वर (ता. करवीर) येथे काल (ता.१९) रात्री फिर्यादीच्या सायकल दुकानासमोर मुले खेळत होती. त्यांच्यात भांडणे झाली. यातून रागाने साहिल सातपुते याने फिर्यादी अशोक धोंडिराम चंदरकर यांना जळाऊ लाकडाने मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
...................
कळंबा येथून अल्पवयीन मुलीचे अपहण
कोल्हापूर, ता. २० ः कळंबा परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबतची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून फूस लावून नेल्याची फिर्याद आहे. अंदाजे पाच फूट पाच इंच उंची, गोरा वर्ण, अंगाने सडपातळ, सरळ नाक, काळे केस, अंगात निळ्या रंगाचा वेश परिधान केलेल्या अपहरणकर्त्याचे वर्णन आहे. अशी व्यक्ती कोणास आढळल्यास करवीर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
..............
विजेच्या खांबावरून
पडून वायरमन जखमी
कोल्हापूर, ता. २० ः टोप येथे वायरिंगचे काम करून खांबावरून उतरताना चक्कर आल्यामुळे पडून वायरमन जखमी झाला. कृष्णात सुराप्पा गावडे (वय २५, रा. शिरोली पुलाची) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सीपीआर पोलिस चौकीत त्याची नोंद झाली.
पोलिसांनी सांगितले की, गावडेने सकाळी टोप येथील विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम केले. त्यानंतर उतरताना चक्कर आल्यामुळे तो पडला. त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाल्याने सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले आहे. तो कंत्राटी कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------