आजपासून पाणीपुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत
आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

sakal_logo
By

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत
कोल्हापूर, ता. २० ः शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा उद्या (ता. २१) पासून सुरळीत होणार आहे. मात्र, सोमवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील काही भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.
बिलांगा उपसा केंद्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीला तांत्रिक समस्या आल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अपुरा पाणी पुरवठा होत असल्यावे शहरातील काही भागांमध्ये रास्तारोको आंदोलनही झाले. मात्र, आता ही समस्या दूर झाली असून आज (ता. २१) पासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. दरम्यान, आज शहरातील जवाहरनगर, मिरजकर तिकटी, गंजीमाळ, जरगनगर, राजेंद्रनगर, मोतीनगर, साळोखेपार्क, वारे वसाहत, शहाजी कॉलनी, शेंडा पार्कसह इतर ठिकाणी मागणीनुसार कळंबा फिल्टर हाऊस आणि कसबा बावडा फिल्टर हाऊसमधून पाणी पुरवठा करण्यात आला.