संपामुळे सीपीआर मधील रुग्णांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपामुळे सीपीआर मधील रुग्णांचे हाल
संपामुळे सीपीआर मधील रुग्णांचे हाल

संपामुळे सीपीआर मधील रुग्णांचे हाल

sakal_logo
By

90391
...

सीपीआरमधील रुग्णांनी सोडला सुटकेचा निश्वास

पाच दिवस रुग्णांचे हालः कुटुंबियांची घालमेल


कोल्हापूर, ता. २० ः जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आला. त्यामुळे सीपीआरमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. संप मिटल्याने रात्रपाळीचे कर्मचारी आणि डॉक्टर हजर झाले. मंगळवार (ता.२१) पासून सर्व कर्मचारी पूर्ण क्षमतेने कामावर येतील.
शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनाही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे सीपीआरमधील वैद्यकीय स्टाफ संपावर गेला. परिणाणी सीपीआरच्या रोजच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला. केसपेपर काढणे, औषधे यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. अखेर ही कामे व्हाईट आर्मीच्या जवानांनी केली. रुग्णांना स्ट्रेचरवरून आणण्याचे कामही त्यांनी केले. आज सायंकाळी संप मागे घेतल्याची बातमी आल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मात्र गेल्या पाच दिवसात सीपीआरमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे आतोनात हाल झाले. काही जणांनी रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवले. संप मागे घेतल्याची माहिती मिळाल्यावर रात्रपाळीचे कर्मचारी कामावर हजर झाले.