महापालिका अर्थसंकल्पीय वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका अर्थसंकल्पीय वितरण
महापालिका अर्थसंकल्पीय वितरण

महापालिका अर्थसंकल्पीय वितरण

sakal_logo
By

मनपास मुद्रांक शुल्कापोटीचे
मिळणार ५ कोटी १८ लाख

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी २०१५-१६ ते २०२१-२२ मधील थकबाकी महापालिकांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेस पाच कोटी १८ लाख ५० हजारांचे अनुदान मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ३१ मार्चपूर्वी हे अनुदान विनाकपात देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
२४ महापालिकांना ३९५ कोटी ५० लाख रुपये वितरित करण्याचा आदेश नगरविकास विभागाने दिला. शहरातील स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री, देणगी आदी कामांच्या रकमेवर एक टक्का दराने अधिभार आकारण्यात येतो. २०१५-१६ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील २४ महानगरपालिकांना देय असलेले एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमेतील थकबाकी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार महापालिकांना ३९५ कोटी ५० लाख वितरित करण्यास मान्यता दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी देय असलेल्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची कपात न करता संबंधित महापालिकांना ३१ मार्चपूर्वी वितरित करण्याचे आदेशही दिले आहेत.
..............................