हिरे महाविद्यालयात खगोलशास्त्र कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरे महाविद्यालयात खगोलशास्त्र कार्यशाळा
हिरे महाविद्यालयात खगोलशास्त्र कार्यशाळा

हिरे महाविद्यालयात खगोलशास्त्र कार्यशाळा

sakal_logo
By

हिरे महाविद्यालयात खगोलशास्त्र कार्यशाळा
गारगोटी, ता. २१ : खगोलशास्त्र हे अवकाश अभ्यासाचे शास्त्र असून, याची व्याप्ती मोठी आहे. विश्‍वातील बदल, त्यांचा विविध ग्रहांवर होणारा परिणाम, ग्रहांची उत्पत्ती ते विनाश असा मोठा आवाका असणाऱ्या खगोलशास्त्रात काम करणाऱ्या संशोधकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची संधी असून, विद्यार्थ्यांनी अवकाशशास्त्राचा अभ्यास करावा, असे आवाहन खगोल अभ्यासक डॉ. अविराज जत्राटकर यांनी केले. येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत आयोजित ‘खगोलशास्त्र’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. समन्वयक डॉ. सागर व्हनाळकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. जत्राटकर यांनी विश्‍व म्हणजे काय, विश्‍वाची निर्मिती व त्यामागचे शास्त्र, विश्वातील वेगवेगळ्या आकाशस्थित वस्तू त्यांचा शास्त्रीय अभ्यास, विश्‍वात आपले स्थान, राशी, नक्षत्र यांची शास्त्रशुद्ध माहिती विद्यार्थ्यांना दिली. या वेळी डॉ. वाय. डी. दीक्षित, प्रा. सी. पी. भगत आदी उपस्थित होते. डॉ. शरद व्हनाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संताजी खोपडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश पाटील यांनी आभार मानले.