पत्रके अन्‌ पत्रके बातम्या

पत्रके अन्‌ पत्रके बातम्या

90370 सदानंद डिगे,
90371 जयसिंग पाडळीकर

मध्यवर्ती जयंती महोत्सवाचे
सदानंद डिगे अध्यक्ष
कोल्हापूर, ता. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व डिगे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सदानंद डिगे यांची निवड झाली. २०२३-२४ करिता कार्यकारिणी निवडीसाठी बैठक झाली. बैठकीत डिगे यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीस समितीचे मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. विजय काळेबाग अध्यक्षस्थानी होते.
समितीच्या सचिवपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांची, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब काळे (आरपीआय), उपाध्यक्षपदी बाजीराव गायकवाड, प्रवीण आजरेकर, सहसचिवपदी ‘रिपाइं’चे (आठवले गट) गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल, असे बैठकीत ठरले. श्री. डिगे यांनी प्रा. डॉ. काळेबाग यांनी जाहीर केलेल्या १०१ व्याख्यानमालेचा संकल्प येत्या वर्षात पूर्णत्वास नेणार असल्याचे जाहीर केले. जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानमालेसह बिंदू चौक सुशोभीत करण्याचा संकल्प करीत विविध कार्यक्रम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समितीवर मार्गदर्शक म्हणून ‘रिपाइं’चे (आठवले गट) संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, दगडू भास्कर, रूपाताई वायदंडे, बाळासाहेब भोसले, प्रा. डॉ. काळेबाग, प्रा. डॉ. शरद गायकवाड, जयसिंग जाधव, सुभाष देसाई, बाजीराव नाईक, टी. एस. कांबळे, पांडुरंग कांबळे मार्गदर्शक आहेत. बैठकीस गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर, प्रदीप मस्के, नीलेश बनसोडे, नामदेव कोथळीकर, बाबासाहेब धनगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com