जलपर्णी मुक्त पंचगंगा

जलपर्णी मुक्त पंचगंगा

ich212.jpg
90410
इचलकरंजी : पंचगंगा नदीतील जलपर्णी पंचगंगा जलतरण मंडळाकडून काढण्यात आली.

-----------
जलपर्णीमुक्त पंचगंगा
---
इचलकरंजीतील पंचगंगा जलतरण मंडळाचा उपक्रम
इचलकरंजी, ता. २१ : शहरातील पंचगंगा नदीस पात्रास जलपर्णीने वेढले असल्याने ती नदी नसून, मैदान भासत आहे. पंचगंगा नदीस जलपर्णीमुक्त करण्याची जबाबदारी पंचगंगा जलतरण मंडळ, महादेव मंदिर घाट येथील सदस्यांनी घेतली. जलपर्णीमुक्त पंचगंगा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवार (ता. १८)पासून सुरू केलेल्या या उपक्रमात नदीपात्रातील बरीचशी जलपर्णी काढण्यात आली. हा उपक्रम नदीचे पात्र जलपर्णीमुक्त होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. उपक्रमात अमित वडिंगे, मोहन खोंद्रे, जयसिंग भाले, सुरेश फातले, सतीश पदमई, रामा तेलसिंगे, सुहास काळे, संभाजी शिंदे, विनायक जोशी, बाबू अपराध, दीपक दत्तवाडे, ॲड. सतीश दरिबे, नामदेव सूर्यवंशी, जितू पोवार, उमेश मजले, विनायक आरेकर आदी सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com