दिव्यांग रोहित गाडवे यांना पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग रोहित गाडवे यांना पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण
दिव्यांग रोहित गाडवे यांना पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण

दिव्यांग रोहित गाडवे यांना पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण

sakal_logo
By

jsp2122
....
दिव्यांग रोहित गाडवे यांना
पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण

दानोळी, ता. २१ ः कवठेसार (ता. शिरोळ) येथील दिव्यांग खेळाडू रोहित कुंतिनाथ गाडवे यांनी कंबोडिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक व भालाफेक स्पर्धेत सिल्व्हर मेडल अशी दोन पदके मिळविली. जगभरातील दिव्यांग स्पर्धकांसाठी कंबोडियामध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात गाडवे यांनी यश मिळविले. घरची प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातच दिव्यांग असूनही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधत्व करून मोठे यश मिळविले आहे. स्पर्धेत निवड होण्यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धा बेंगलोरला घेतली होती. त्यात त्यांना लांब उडीमध्ये सुवर्णपदक व थाळी फेकमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले होते. दिल्लीत गेल्या जानेवारीत झालेल्या नॅशनल स्पर्धेत लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक, तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. या यशाबद्दल त्यांचे व कुटुंबीयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
...........................