माविम प्रदर्शन समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माविम प्रदर्शन समारोप
माविम प्रदर्शन समारोप

माविम प्रदर्शन समारोप

sakal_logo
By

‘माविम’च्या प्रदर्शनात ३५ ते ४० लाखांची उलाढाल

सचिन कांबळे ः नवतेजस्विनी बचत गट प्रदर्शनाचा समारोप

कोल्हापूर, ता. २१-ः ‘ प्रदर्शनात ११० बचत गट व २२० महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांसाठी दुपारच्या जेवणाची सोय तसेच ज्या महिला मुक्कामी होत्या त्यांना मुक्कामपर्यंत वाहतूक व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. या प्रदर्शनात बचत गटाची गेल्या ३ दिवसांत जवळपास ३५ ते ४० लाखाची उलाढाल झाली आहे.’ अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांची उत्‍पादने विक्री प्रदर्शनाच्या समारोपावेळी बोलत होते. यावेळी ऊस व गुळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक बी. जी. गायकवाड, नाबार्डचे महाव्यवस्थापक आशुतोष जाधव उपस्थित होते.

अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी बचत गटातील महिला या उद्योजिका बनल्या आहेत, असे सांगितले. ऊस व गुळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक बी. जी. गायकवाड म्हणाले,‘आपल्या रोजच्या आहारात तृणधान्यचा वापर करावा, सेंद्रिय गुळाचा वापर करावा. ज्यामध्ये पौष्टिकचे प्रमाण अधिक असते. बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायामध्ये पुढाकार घ्यावा.’ यावेळी लेखाधिकारी विनायक कुलकर्णी उपस्थित होते.