एज्युकेशन बातम्या एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशन बातम्या एकत्रितपणे
एज्युकेशन बातम्या एकत्रितपणे

एज्युकेशन बातम्या एकत्रितपणे

sakal_logo
By

‘स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी
समाजाचे महत्वाचे योगदान’

कोल्हापूर : ‘‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजाचे योगदान महत्वाचे आहे,’’ असे प्रा. डॉ. खंडेराव शिंदे यांनी सांगितले. गोखले महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आणि डी. आर. के. कॉलेज क्लस्टर अंतर्गत ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे योगदान’ यावर इतिहास विभाग, समाजशास्त्र विभागातर्फे एकदिवसीय कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. सी. पी. कुरणे यांनी स्वागत केले. प्रा. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, दौलतराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. सी. पी. कुरणे, प्रा. एस. एन. बोरवडेकर, प्रा. एम. के. पवार, प्रा. डी. के. डाके उपस्थित होते. प्रा. ए. एम. गाईंगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. के. डाके यांनी आभार मानले.
...


भौगोलिक मॉडेल प्रदर्शन कौतुकास्पद : डॉ. पाटील
कोल्हापूर : ‘‘मुलांमध्ये असणारे सुप्त विषय मॉडेलच्या माध्यमातून मांडण्यासाठी गोखले कॉलेजचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,’’ असे मत न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी व्यक्त केले. गोखले महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. संभाजी शिंदे, विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. सुनील भोसले, न्यू कॉलेजमधील डॉ. संपदा टिकेकर यांनी यांनी मार्गदर्शन केले. प्रा. जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, दौलतराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, प्रा. डॉ. सुस्वरे, प्रा. योगेश मर्दाने, प्रा. सचिन रजपूत, प्रा. निलेश सासने उपस्थित होते. विभाग प्रमुख प्रा. एस. ए. मेणशी यांनी स्वागत केले. प्रा. मेणशी यांनी सूत्रसंचालन केले.
...
बी. टी. कॉलेजमध्ये ‘अंनिस’चे अभ्यास शिबिर
कोल्हापूर : श्रीमती महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयांमध्ये दोनदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शिबिराचे प्राचार्य डॉ. चरणदास
कांबळे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्‌घाटन झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास पोवार अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. एल. एस. पाटील यांनी स्वागत केले. छाया पवार, माणिक यादव, सीमा पाटील, रमेश वडणगेकर यांचा सत्कार झाला. संजय अर्दाळकर यांनी आभार मानले.