Fri, June 9, 2023

बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकावर कारवाई
बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकावर कारवाई
Published on : 21 March 2023, 2:11 am
बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकावर कारवाई
तारदाळ, ता. २१ : भारत निर्माण नळ पाणीपुरवठा योजनेच्या बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. आज दत्त मंदिराशेजारी असणाऱ्या राजेश पाटील यांनी मुख्य पाईप लाईनमधून नळ कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामविकास अधिकारी बाबासो कापसे, सरपंच पल्लवी पोवार, रणजीत पोवार, सुरज कोळी आदिंनी पंचनामा करून कनेक्शन कट केले. संबंधितांकडून सात वर्षांची पानीपट्टी आकारणी करून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
संबंधित कारवाईबाबत राजेश पाटील यांचे वडील के. जी. पाटील माहिती देताना म्हणाले, ‘२०१६ मध्ये रितसर डिपॉझिट भरून कनेक्शन घेतले होते. कनेक्शन बंद करण्याचे कमिटीला कळवूनही या योजनेकडून कनेक्शन बंदचे लेखी पत्र आम्हाला दिले नाही. व कनेक्शन कट केले नाही.’