आडमुठे धोरण सोडा, विनाअट अनुदान द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडमुठे धोरण सोडा, विनाअट अनुदान द्या
आडमुठे धोरण सोडा, विनाअट अनुदान द्या

आडमुठे धोरण सोडा, विनाअट अनुदान द्या

sakal_logo
By

फोटो-
....

आडमुठे धोरण सोडा, विनाअट अनुदान द्या

शिक्षकांची मागणी; शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलन

कोल्हापूर ः राज्यातील काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा फटका आम्हाला बसत आहे. त्यांच्यावर कारवाई करा. विनाअट अनुदान द्या, अशी मागणी विनाअनुदानित शिक्षकांनी आज केली. या मागणीसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित कृती समितीच्या नेतृत्वाखाली त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, त्रुटी पुर्तता, वाढीव टप्पा शाळा, वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, त्यामधील काही अटी पूर्णपणे चुकीच्या, तांत्रिक आहेत. हे शासन निर्णय काढताना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना माहीत होते. शाळा, वर्ग तुकड्या पूर्णपणे तपासून छाननी करू पात्र झालेल्या आहेत. तरीही सन २०२२-२३ ची संच मान्यता आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत आणि सर्व वैध असावेत हा नियम लावण्याचा अट्टाहास का?, असा सवाल कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केला. या अटीमुळे राज्यातील अनेक शिक्षणाधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. शिक्षणाधिकारी यांचा अनेक ठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे. राज्यातील ज्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जर अनुदान ३१ मार्च २०२३ पर्यंत मिळाले नाही तर अशा सर्व अधिकाऱ्यांवर ७ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करावी. जाचक अटी रद्द करा आणि विनाअट अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आले.
या आंदोलनात गजानन काटकर, बाबासो पाटील, राजेंद्र माने, भानुदास गाडे, सावंता माळी, शिवाजी घाटगे, रामराजे सुतार, विनोद कोठावळे, मच्छिंद्र जाधव, केदारी मगदूम, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, उत्तम जाधव आदी सहभागी झाले.