पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिवाजी विद्यापीठाच्या संघाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिवाजी विद्यापीठाच्या संघाला फटका
पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिवाजी विद्यापीठाच्या संघाला फटका

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिवाजी विद्यापीठाच्या संघाला फटका

sakal_logo
By

90576


राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत
शिवाजी विद्यापीठ द्वितीय
कालिकत, दिल्ली विद्यापीठावर मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : चंदीगड येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धा झाली. त्यात शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने साखळी सामन्यात कालिकत युनिव्हर्सिटीचा ४-२ असा, तर दिल्ली विद्यापीठाचा तब्बल १७ - १ असा पराभव करून द्वितीय क्रमांक मिळविला.
सोमवारी (ता.२०) झालेल्या मानांकनाच्या सामन्यात कुरुक्षेत्र विद्यापीठाविरुद्ध शिवाजी विद्यापीठाने ४ - २ असा विजय मिळवून अंतिम चार संघात स्थान मिळवत साखळी फेरीत प्रवेश केला. आज पहिल्या साखळी सामन्यात कालिकत विद्यापीठाचा १-४ असा पराभव करून दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या सामन्यात दिल्ली विद्यापीठाला तब्बल १७ - १ असे हरवले. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या यशात आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्नाली वायदंडे हिने जोरदार पिचिंग केले. तिच्या पिचिंगपुढे संपूर्ण भारतातून आलेल्या एकाही खेळाडूचा निभाव लागला नाही. तिला कॅचर ऐश्वर्या पुरी हिने अचूक साथ दिली. त्याचबरोबर करिष्मा कुडचे, पल्लवी कांबळे, साक्षी लगाडे, सुजाता थोरवडे, सृष्टी कदम, वेदश्री पाटील यांनी फलंदाजीमध्ये चांगली साथ दिली. दरम्यान, या राष्ट्रीय स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सुरूवातीपासून दमदार कामगिरी केली. मात्र, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका संघाला बसला असल्याचे संघ व्यवस्थापक डॉ. बाबासो उलपे यांनी सांगितले.
-----------------
विद्यापीठाचा संघ असा
विद्यापीठाच्या संघात स्वप्नाली वायदंडे (कर्णधार), ऐश्वर्या पुरी, करिष्मा कुडचे, पल्लवी कांबळे, सानिका संकपाळ, गौरी माळी, आलिशा कांबळे, सृष्टी कदम, निरुपमा कांबळे, वेदश्री पाटील, साक्षी लगाडे, सुजाता थोरवडे, निकिता जाधव, दीक्षा शिंदे, शितल जाधव, राधिका कळंत्रे, प्रशिक्षक सुशांत कायपुरे, संघ व्यवस्थापक डॉ. बाबासो उलपे यांचा समावेश आहे. या संघाला कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.