घरफाळा थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा थकबाकी
घरफाळा थकबाकी

घरफाळा थकबाकी

sakal_logo
By

घरफाळा थकीत रकमेवरील
दंडव्याज सवलत ३१ पर्यंतच
कोल्हापूर, ता. २१ : घरफाळा थकीत रकमेवरील ४० टक्के दंडव्याज सवलतीचे दहा दिवस राहिले आहेत. १ एप्रिलपासून थकबाकीदार मिळकतधारकांवर जप्ती, बोजा चढवणे, मिळकत सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये यंदाच्या घरफाळ्यासह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये १ ते ३१ मार्चअखेर ४० टक्के प्रमाणे सवलत जाहीर केली आहे. ९ ते २८ फेब्रुवारीअखेर ५० टक्के सवलत योजना सुरू होती. त्यात १०,२३९ करदात्यांनी १६ कोटी ५८ लाख ६७ हजार ५९४ रुपयांची थकीत रक्कम जमा केली आहे. १ एप्रिल २०२२ ते २१ मार्च २०२३ अखेर शहरातील ९८,२४८ करदात्यांकडून ६८ कोटी ४३ लाख ८६ हजार ८३३ रक्कम जमा झाली आहे. नागरिकांनी ४० टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.