ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायतींची आज घोषणा

ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायतींची आज घोषणा

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायतींची आज घोषणा

जलदिनानिमित्त ग्रामसभांमध्ये होणार ठराव


कोल्‍हापूर,ता.२१: बुधवारी (ता.२२) होणाऱ्या‍ जागतिक जलदिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन केले जाणार असून, यात हर घर जल, हागणदारीमुक्त अधिक दर्जा प्राप्त केल्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंर्तगत ग्रामीण लोकांचा सहभाग वाढवून सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता करून देण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याबाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कार्यवाही करून ज्या गावांनी घन कचरा किंवा द्रव कचरा सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे, त्यांनी त्यांच्या ग्रामसभेत स्वतःला हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्‍लस) घोषित करावे, असे आवाहन श्री.चव्‍हाण यांनी केले.

जल जीवन मिशनच्या निकषानुसार ज्या गावांनी गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा आणि अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे, अशा ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन हर घर जल मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वत्र २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मंगळवारी ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

...

शाळा, महाविद्यालयांत आज जल प्रतिज्ञा

ाजागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्‍ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय येथे जल प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची तपासणीची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. यावेळी जलस्त्रोत परिसराची स्वच्छता व पाणी साठवण टाकी सफाई मोहिम राबवली जाणार आहे. लोकवर्गणी, पाणीपटटी गोळा करणेबाबत गृहभेटी देवून जनजागृती केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com