घरोघरी आज मांगल्याची गुढी

घरोघरी आज मांगल्याची गुढी

मांगल्याची गुढी आज घरोघरी उभारणार
कोल्हापूर, ता. २१ ः गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्या (बुधवारी) घरोघरी मांगल्य आणि समृद्धीची गुढी उभारली जाणार आहे. यानिमित्ताने विविध नवीन प्रकल्पांना प्रारंभ होणार असून बाजारपेठेत खरेदीचा उत्सव रंगणार आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आज गुढीपूजनासाठी आवश्यक विविध साहित्याच्या खरेदीसाठीही बाजारपेठेत गर्दी राहिली.
सराफ कट्ट्यापासून रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, सायकली-हेल्थ इक्विपमेंटस, गारमेंट अशा सर्वच क्षेत्रात तेजीचे वातावरण असून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही स्मार्ट मोबाईलची खरेदी मोठ्या संख्येने होणार असून त्यासाठी विविध अर्थसहाय्याच्या योजनाही उपलब्ध आहेत. शाळा प्रवेशासाठीही सकाळपासूनच सर्वत्र झुंबड उडणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी आजच पालकांनी केली. महापालिका व जिल्हापरिषदेच्या शाळांत प्रवेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

भव्य शोभायात्रा निघणार
नववर्षाचे स्वागत करताना करवीर गर्जना ढोल पथकातर्फे सकाळी नऊ वाजता बिनखांबी गणेश मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. सलग सहाव्या वर्षी हा उपक्रम होणार आहे. ‘सांस्कृतिक लोककलांची अमृतधारा, जतन करू महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर ही शोभायात्रा निघेल. चित्ररथ, रंगाविष्कार दुचाकी पथक, मर्दानी खेळ, लेझीम पथक, बालचमू वेशभूषा स्पर्धा (वयोगट ५ ते १२ वर्षे) ध्वजपथक, करवीर गर्जना ढोल पथक आणि छत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी देवी यांच्या प्रतिमा शोभायात्रेत असतील. सकाळी नऊ वाजता बिनखांबी गणेश मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com