बीग स्टोरी... लुकींग स्मार्ट

बीग स्टोरी... लुकींग स्मार्ट

91853

सुंदर मी होणार...
स्मार्ट दिसण्यासाठी अत्याधुनिक उपचार; त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी

इ्रंटो...
लग्नापासून गुढीपाडव्यापर्यंत आणि वास्तूशांतीपासून कार्यालयातील कार्यक्रमापर्यंत स्मार्ट दिसण्यासाठी महिला-पुरुष त्वचारोग तज्ज्ञांकडे जात आहेत. हजार-दीड हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यतचा खर्च केवळ ‘स्मार्ट’ दिसण्यासाठी केला जात आहे. कोट्यवधींची मशिनरी कोल्हापुरात उपलब्ध आहे. चेहऱ्यासह शरीरावरील व्यंग काढण्याबरोबरच डोक्यावरील गेलेले केस पुन्हा आणणे, लासा, तीळ, काळे डाग, चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यापर्यंतचा ग्राहक त्वचारोग तज्ज्ञांकडे वळला आहे. एकंदरीतच ‘लुकिंग स्मार्ट’साठी सर्वकाही सुरू आहे.
- लुमाकांत नलवडे
------

बदलत्या जीवनशैलीत स्वतःला स्मार्ट ठेवण्यासोबतच स्मार्ट दिसण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रात्री बारा ते चार दरम्यान गाढ झोप होणे हे शरीर अधिक चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. वेळेवर जेवन, दैनंदिन व्यायाम, आहार नियंत्रण, योगा हे सदृढ शरीर आणि स्मार्ट लूकसाठी महत्वाचे आहे. मात्र ते जमत नसल्यामुळे त्वचेवर वेगवेगळे उपाय करावे लागतात. चेहरा गोरा करा.. म्हणणारेही ग्राहक डॉक्टरांकडे जात असल्याची उदाहरणे आहेत. मात्र असे होत नाही. जन्मतः मिळालेली त्वचाच कायम राहते. मात्र तात्पुरता बदल करता येतो. त्याकडेच कल वाढत आहे.

‘स्मार्ट’ दिसणेच ‘क्वॉलिफिकेशन...’
लग्नावेळी मेकअप करणे म्हणजे नावीन्य मानले जात होते. मात्र कालौघात त्वचा तजेलदार, गोरी ठेवण्याकडे सर्वांचा कल दिसतो. व्यंग कमी करण्यासाठी त्वचा रोगतज्ज्ञांकडे कार्यक्रमात स्मार्ट दिसण्यासाठीही उपचार घेतले जात आहेत. कार्यालयात लोकांचा संपर्क येणाऱ्या नोकरीसाठी विशेष करून रिसेप्‍शनिस्ट, बॅंक कर्मचारी, कमर्शियल कार्यालयातील अधिकारी, मार्केटींगच्या नोकरीतील कर्मचारी, एअर हॉस्टेस यांचा अधिक ओढा आहे. कारण नोकरीत स्मार्ट दिसणे हे ‘क्वालिफिकेशन’ (योग्यता) मानली जाते.

बारशापासून विशेष कार्यक्रमापर्यंत....
लग्न, बारसे, पाहुण्यांकडील कार्यक्रम यासाठीही कार्यक्रमापूर्व महिना, आठवडे, एक दिवस आधीपर्यंत वेगवगेळे उपचार घेतले जातात. यासाठी महिना दीड ते तीन हजार रुपये खर्च केला जातो. अत्याधुनिक यंत्राद्वारे लेसर किंवा ई-पिलिंगही केले जाते. केमिकलद्वारे डाग घालविण्यापासून उजळ दिसण्यापर्यंतचे उपचार घेतले जातात. त्यामुळे महिलांसह तरुण, पुरुषांकडूनही कार्यक्रमात उठावदार दिसण्यासाठी उपचार घेतले जात आहेत.
----------------
त्वचारोगासाठी नव्हे.. स्मार्ट दिसण्यासाठी...
चेऱ्यावरील पिंपल्स, केस, काळे डाग, डोळ्याखालील काळेपणा, कानावरील केस, महिलांना ओठांवर आलेले केस काढण्यासाठी त्‍वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. औषधांबरोबरच छोट्या-मोठ्या केमिकल उपचारावर हे आजार, व्यंग कायमचे निघून जातात. सहा दिवसांत चेहऱ्यावरील व्यंग काढण्यात येते. यासाठी आठ-दहा हजार रुपये खर्च करावे लागतात. चेहरा उजळ करण्याची यंत्रसामुग्री कोल्हापुरात आली आहे. त्यामुळेच एका त्वचारोग तज्ज्ञाकडे रोज ऐंशी ते शंभर ग्राहक येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
-----------

कोट
पूर्वी डाग, गजकर्ण अशा त्वचारोगांसाठीच ग्राहक त्वचारोग तज्ज्ञांकडे जात होता. मात्र ट्रेंड बदलला आहे. स्मार्ट दिसण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि बारशापासून लग्नापर्यंतच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे उपचार घेतले जात आहेत. त्वचा तजेलदार, डोक्यावर भरपूर केस यासाठी सुद्धा ग्राहक आमच्याकडे येत आहे. अत्याधुनिक यंत्रणेमुळे योग्य खर्चात आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे ग्राहकांचा ओढा वाढत आहे.
- डॉ. माधवी लोकरे (त्वचारोग तज्ज्ञ)
-------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com