आजरा ः विशेष बातमी

आजरा ः विशेष बातमी

ajr214.jpg.....
90597
होनेवाडी ः हत्तीवडे ते होनेवाडी हा रस्ता श्रमदानातून तयार करताना ग्रामस्थ.
--------------------

साथी हाथ बढाना...!
होनेवाडीत अनुभवाला आले चित्र ; श्रमदानातून ग्रामस्थांनी केला रस्ता

आजरा, ता. २१ ः साथी हाथ बढाना.... एक अकेला थक जायगा.. मिलकर बोज उठाना.... साथी हाथ बढाना..’ हे गाणं साठच्या दशकात घेऊन जाते. त्या काळात दिलीपकुमार यांच्या नया दौर चित्रपटातील हे गीत चांगलेच गाजले होते. असाच काहीसा अनुभव होनेवाडी (ता. आजरा) अनुभवास मिळाला. ग्रामस्थांनी होनेवाडी ते हत्तीवडे असा एक किलोमीटर लांबीचा रस्ता श्रमदानातून तयार केला. गावात अनेक वर्षांपासूनची श्रमदानाची परंपरा कायम राखली असून ग्रामसमृध्दीची संकल्पना राबवत एकजुटीचा आदर्श ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवला आहे.
श्रमदानाची परंपरा जोपासणारे गाव अशी होनेवाडीची ओळख आहे. यातून त्यांनी शासनाचे विविध पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सन १९९५-२००० चा जिल्ह्यातील आदर्श गाव होनेवाडी पुरस्कार व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वीकारलेला ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ असे प्रमुख पुरस्कार आहेत. आजही गावात श्रमदानाची परंपरा अबाधित आहे, याची प्रचिती आली. हत्तीवडे - होनेवाडी दोन्ही गावांना जोडणारा वाहतुकीचा मुख्य रस्ता त्यांनी श्रमदानातून केला.
अरुंद रस्त्यामुळे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. रस्त्याच्या दुतर्फा हत्तीवडेतील शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने व सर्वच शेतकरी अल्पभूधारक असल्याने अनेकदा बैठका होऊनही प्रश्न सुटला नाही. होनेवाडीतील शंकर पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा सुतार, आप्पासाहेब बेळगुंदकर, संजय कातकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याशी चर्चा करून अडचण मांडली. त्यांनी मोठे मन दाखवत रस्त्यासाठी जमीन दिली आहे. दहा फुटांचा रस्ता १८ फूट केरण्यात आ आहे. गावात रविवारी पाळक पाळून महिला, युवा, जेष्ठ सर्वच झटून कामाला लागले. मोठाले दगड, मुरूम यांची जमवाजमव केली. गावातील ट्रॅक्टर, जेसीबीधारकांनी वाहने उपलब्ध करून दिली. रमेश पाटील, अमर पाटील, नामदेव पाटील, कृष्णा पाटील व राजर्षी शाहू व्यायाम शाळेच्या युवकांनी नियोजन केले. स्वखुशीने आर्थिक निधी उभारला. याकामी ग्रामपंचायत, सरपंच व सदस्यांचे सहकार्य लाभले. सामाजिक संस्था, उत्सव मंडळे, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक निधी दिला. होनेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई व श्री दत्त जयंती उत्सव फंड यांनीही मदत केली. तहसीलदार विकास अहिर यांनीही होनेवाडीकरांच्या श्रमदानाची दखल घेत ग्रामस्थांचे काैतुक केले.

चौकट-
* मजुबतीकरणाची गरज
ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलेल्या रस्त्याचे कायमचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी रस्त्याला निधी लावून सहकार्य करावे, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com