बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

90627

बाजार समित्यांसाठी
२८ एप्रिलला मतदान
येत्या २७ पासून अर्ज; कोल्हापूरसह जयसिंगपूर, गडहिंग्लजचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः येथील शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम आज नव्याने जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या २८ एप्रिलला मतदान आहे. मतदान झाल्यापासून पुढील तीन दिवसांत मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. तसे आदेश जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, अडते व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजर समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदार यादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ठ होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या. त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने प्राधिकरणास दिली. यानंतर जिल्हा निवडणूक प्राधिकारणाने निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम असा :
निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे ः ता. २७ मार्च
अर्ज भरण्याची अंतिम मुदत ः ता. ३ एप्रिल
अर्ज छाननी ः ता. ५
वैध अर्ज प्रसिद्धी ः ता. ६
अर्ज माघाराची मुदत ः ता. २०
चिन्हे वाटप ः ता. २१
मतदान ः ता. २८
मतमोजणी निकाल जाहीर करण्याचा दिवस ः मतदान दिवसापासून पुढील तीन दिवसांच्या आत

शेतकरी उमेदवारीबाबत संभ्रम
जिल्हा शेती बाजार समितीची निवडणुकीत यंदापासून शेतकऱ्यांना लढवता येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्यास मान्यता देण्याबाबत आदेश मागविले. त्यानंतर या निर्णयावर हरकतीही मागविल्या होत्या. त्याची मुदत १३ मार्चपर्यंत होती. काही हरकती दाखल झाल्या; मात्र त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. शासनाकडूनही हरकतींबाबत काय करावे, याच्या कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी अर्ज भरावा की न भरावा याबाबत संभ्रम आहे.

प्रत्येकी १८ जागांसाठी लढत
कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समितीत प्रत्येकी १८ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. विकास सेवा संस्थातून ११ जागा असून यात सात सर्वसाधारण, दोन महिला, प्रत्येकी एक भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती, ओबीसी तर ग्रामपंचायतीतून चार जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यात दोन सर्वसाधारण, प्रत्येकी एक अर्थिक दुर्बल व अनुसुचित जाती, अडते व व्यापारी प्रतिनिधी दोन जागा तर तोलाई व हमाल एक अशा १८ जागासाठी निवडणूक आहे. पूर्वी १९ जागा होत्या. यातील सहकारी व्यापारी मतदार रद्द झाल्याने आता होणारी निवडणूकही १८ जागांसाठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com