भाजप बैठक बातमी

भाजप बैठक बातमी

(फोटो - ९०६२४)

कोल्हापूरच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर शहराची हद्दवाढ यांसह जिल्ह्याचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी राज्यात आणि केंद्रात पाठपुरावा करू,’ असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा बैठकीत आढावा घेतला.
मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची बैठक मुंबई भाजप कार्यालय (नरिमन पॉइंट) येथे झाली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, लोकसभा निवडणूक याबद्दल चर्चा झाली. बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेश सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव बैठकीस गेले होते. त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा याबाबत विवेचन केले. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा राज्य आणि केंद्र सरकारकडे करू, असे आश्वासन बावनकुळे यांनी बैठकीत दिले.
-----------------------------------
संभ्रम पसरवणाऱ्यांवर कारवाई
बैठकीत महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांची तक्रार केली. काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक अध्यक्ष निवडीबाबत सोशल मीडियावरून संभ्रम पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर अशा कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
--------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com