
महालक्ष्मी अन्नछत्र देणगी उपक्रम
90713
...
महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे
‘रूपयाचे दान, पुण्यमहान'' उपक्रम
कोल्हापूर ः येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने बुधवार (ता.२२) पासून ‘एक रुपयाचे दान, पुण्यमहान'' या उपक्रमाला प्रारंभ झाला. गुढी पाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या कार्यात आपल्या मिळकतीतील रोजचा एक रुपया याप्रमाणे वार्षिक तीनशे पासष्ठ रूपये अन्नदानासाठी द्यावे, असे आवाहन ट्रस्टने केले होते. त्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी अन्नछत्राच्या कार्यालयात ही देणगी द्यावी, असे आवाहन यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.
दरम्यान, ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी राजेश सुगंधी, तन्मय मेवेकरी, सचिन पाटील, प्रतीक गुरव, रजत जोशी, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.