स्वामी समर्थ प्रकट दिन आज

स्वामी समर्थ प्रकट दिन आज

स्वामीसमर्थ प्रकट दिन सोहळा आज
कोल्हापूर, ता. २२ ः ‘अक्कलकोटी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी..’ अशा गजरात उद्या (गुरूवारी) सर्वत्र स्वामीसमर्थ प्रकट दिन सोहळा सजणार आहे. पालखी सोहळ्याबरोबरच विविध ठिकाणी महाप्रसादांचे आयोजन होणार आहे. दरम्यान, रक्तदान शिबिर, समाजातील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आदी उपक्रमावरही भर दिला जाणार आहे.
प्रज्ञापुरीतील स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे सकाळी नऊला श्री स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन होईल. त्यानंतर महारूद्र हवन होईल. सायंकाळी पाचला पालखी सोहळा होईल तर सात वाजता महाप्रसाद होईल. जवाहरनगरातील स्वामीसमर्थ सेवा समूहातर्फे सकाळी पाऊणे आठला प्रकटक्षण सोहळा होईल, नऊला पालखी सोहळा तर अकरा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसाद व रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी साडेसातला कथक नृत्य व दीपोत्सव सोहळा होईल. संभाजीनगर मगरमठी येथील श्री स्वामीसमर्थ भजनी मंडळातर्फे सकाळी सहाला लघुरूद्र विधी होईल. रात्री आठ वाजता मंडळाच्या भजनाने उत्सवाची सांगता होईल. लाईन बाजार साईराज कॉलनी येथील स्वामी समर्थ मंडाळातर्फे सकाळी सातला रूद्राभिषेक, त्यानंतर नऊला सूरमय भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी पाचला पालखी सोहळा आणि रात्री आठला महाप्रसाद होईल. त्याशिवाय कोटीतीर्थ स्वामीसमर्थ मंदिरासह विविध मंदिरातही धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com