डीकेटीईत उभारली स्वरांची गुढी

डीकेटीईत उभारली स्वरांची गुढी

ich222.jpg
90718
इचलकरंजी : डीकेटीईतर्फे आयोजित गुढी पाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात’ हा संगीतमय कार्यक्रम झाला.

डीकेटीईत उभारली स्वरांची गुढी
‘स्वरप्रभात’ कार्यक्रमाला दाद; पारंपारीक वेशभूषेत श्रोत्यांची उपस्थीती

इचलकरंजी, ता. २२ ः येथील डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. डीकेटीई संस्था, आपटे वाचन मंदीर व पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळातर्फे आयोजन केले आहे. श्रोत्यांनी पारंपारीक वेशभूषेत उपस्थिती लावून कार्यक्रमास दाद दिली. यावेळी एकाहून एक अशा सरस मराठी गीतांचे गायक कलाकारांनी दर्जेदार सादरीकरण करीत मराठी नववर्षाचे स्वागत केले.
गिरीश कुलकर्णी यांनी `राग मिया की तोडी` सादर केला. शास्त्रीय गायनानंतर पं. बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाचे गौरी पाटील, जितेंद्र कुलकर्णी, श्रध्दा सबनीस, प्रियंका मिरजकर, मधुरा, शतायू, शिवाजी लोहार अशा गायक कलाकारांनी कर्णमधुर अशी अवीट मराठी गीते सादर केली. अनेक गाण्यांना वन्स मोअरने रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सर्वांना संगीतकार लक्ष्मण पाटील व त्यांच्या समूहाने मार्गदर्शन केले.
डीकेटीईच्या बालवाद्यवृंदाकडून दर्जेदार संगीत कलेचे सादरीकरण झाले. त्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. बालवाद्यवृदांची तयारी गिरीश कुलकर्णी यांनी करुन घेतली होती. उत्कृष्ठ वेशभूषा केलेल्यांना विविध पारितोषीके दिली. यामध्ये वासुदेवाच्या रुपात संजय काशिद, नवनाथाच्या रुपात विनायक पोतदार, तर चिमुकली शुभ्रा पाटील, स्वरा पाटील व मिहिरा पाटील यांनी राम, सीता, हनुमान यांची वेशभूषा केली होती. गार्गी माने हिने केलेली राजमाता जिजाऊंची वेशभुषा लक्षवेधी ठरली. पारंपरिक उत्कृष्ट वेशभुषा केलेल्या केतकी कुलकर्णी व ज्ञानदा जोशी यांना पारितोषिक दिले.
संगीत व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबददल प्रा. एस. जी. कानिटकर यांचा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते विशेष सत्कार केला. डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, उमेश कुलकर्णी, सुषमा दातार, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, जनता बँकचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, स्वानंद कुलकर्णी, सर्जेराव पाटील, वैशाली आवाडे, प्रभारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com