तालीम संघ पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालीम संघ पत्रकार परिषद
तालीम संघ पत्रकार परिषद

तालीम संघ पत्रकार परिषद

sakal_logo
By

लोगो-
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा

सांगलीत होणारी स्पर्धा अधिकृत
---
कोल्हापूर तालीम संघ; पुण्याच्या राजकारणामुळे पैलवानांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : सांगलीत उद्या (ता. २३)पासून सुरू होणारी महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हीच अधिकृत आहे, अशी माहिती कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील दोन गटांच्या राजकारणामुळे पैलवानांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘खासदार प्रा. संजय मंडलिक व अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तसे पत्र आले तर शहर राष्ट्रीय तालीम संघ स्पर्धेला मान्यता देईल, असे आमचे म्हणणे होते. तसे पत्र अद्याप मिळालेले नाही. सांगलीतील स्पर्धेला कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिली आहे. त्या स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून, विविध जिल्ह्यांतील महिला सांगलीत दाखल झाल्या आहेत.’’
उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले म्हणाले, ‘‘भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून अस्थायी समिती स्थापन केली होती. या समितीने पुण्यात १ ते ७ एप्रिलदरम्यान महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे. या समितीला स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही.’’ अभिनेत्री सय्यद यांनी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत शासनाचे नव्हे, तर अस्थायी समितीने स्पर्धा घेण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र दाखविले होते. अस्थायी समितीला स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.
ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘राज्य कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याचा अधिकार आहे. गेली कित्येक वर्षे परिषद पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करते. महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान परिषदेचाच आहे.’’ पत्रकार परिषदेस हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, वस्ताद अशोक माने, संभाजी वरुटे, अशोक पोवार उपस्थित होते.

निमंत्रितांच्या स्पर्धेस मान्यता देऊ
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी घोषणा केलेली महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ शकत नाही. ती घेण्याचा अधिकार राज्य कुस्तीगीर परिषदेला आहे. सय्यद यांनी महिलांची निमंत्रितांची स्पर्धा घ्यायचे ठरविल्यास त्याला शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ मान्यता देईल, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.