आजरा ः आजरा नळपाणीपुरवठा योजना शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आजरा नळपाणीपुरवठा योजना शुभारंभ
आजरा ः आजरा नळपाणीपुरवठा योजना शुभारंभ

आजरा ः आजरा नळपाणीपुरवठा योजना शुभारंभ

sakal_logo
By

ajr221.jpg....

90730

पावसाळ्यापूर्वी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न
अशोक चराटी ; आजऱ्यात नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

आजरा, ता. २२ ः नवीन नळपाणीपुरवठा योजनेमुळे शहरवासीयांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार आहे. ही योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी युध्दपातळीवर काम केले जाईल, असे ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी सांगितले.
येथील गांधीनगर पंप हाऊसजवळ आज नळपाणी योजनेचा भूमिपूजन श्री. चराटी यांच्या हस्ते झाले. यावेळी चराटी यांनी योजनेबाबत माहिती दिली. यावेळी ठेकेदार भोसले व मान्यवरांचा सत्कार झाला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, डाॅ. अनिल देशपांडे, सुरेश डांग, डाॅ. दीपक सातोसकर, नगरसेवक विलास नाईक, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, आनंदा कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. चराटी म्हणाले, ‘आजरा शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी २७ कोटींची योजना मंजूर आहे. ग्रामपंचायत असताना आमचे प्रयत्न सुरु होते. आता नगरपंचायत झाल्यावर मूर्तस्वरूप आले आहे. यामध्ये अंतर्गत नवीन जलवाहिनी, जॅकवेल, जलशुध्दीकरण केंद्र, आवंडी वसाहत, खेडेकर काॅलनी, राईस मिल (एकता काॅलनी ) येथे जलकुंभ उभारले जातील. मुख्यमंत्री, आमदार प्रकाश आबिटकर व सर्वांच्याच सहकार्यामुळे ही योजना मंजुरीसाठी सहकार्य मिळाले आहे. यावेळी नगरसेविका शुभदा जोशी, संजीवनी सावंत, सीमा पोवार, किरण कांबळे, सिकंदर दरवाजकर, सुमैय्या खेडेकर, यास्मीन बुड्डेखान, रेश्मा सोनेखान, यासीराबी लमतुरे, अनिकेत चराटी, संजय चव्हाण, संजय जोशींसह मान्यवर उपस्थित होते.
चाैकट -
* मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच्या हस्ते उद्घाटन
नळपाणी पुरवठा योजना व छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिले जाईल. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री. चराटी यांनी सांगितले.