आयजीएमला ३०० बेड मंजूरीमुळे बुस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयजीएमला ३०० बेड मंजूरीमुळे बुस्टर
आयजीएमला ३०० बेड मंजूरीमुळे बुस्टर

आयजीएमला ३०० बेड मंजूरीमुळे बुस्टर

sakal_logo
By

01496
---------------
आयजीएमला ३०० बेड मंजूरीमुळे बुस्टर
अनेक विभाग होणार सुरू; वस्त्रनगरीत रुग्णांवर योग्य उपचारास मदत
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता: २२ ः आयजीएम रुग्णालयास २०० वरुन ३०० बेडची मंजूरी मिळाल्याने रुग्णालय सुसज्ज होण्यास गती मिळाली आहे. रुग्णालय समस्यांशी झगडत असताना १०० बेड वाढीमुळे नव्याने १५२ कर्मचाऱ्‍यांची भरती होणार आहे. परिणामी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्‍यांच्या अभावामुळे रुग्णालयातील बंद असलेले अनेक विभाग पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. सध्या २०० बेडचे रुग्णालय १०० बेडचे कर्मचारी हाताळत असल्याने पडणारा अतिरेक ताण कमी होणार आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यासही मदत होणार आहे.
आयजीएम शासनाकडे हस्तांतर झाल्यापासून अपुऱ्‍या कर्मचाऱ्‍यांच्या प्रश्नाशी झगडत आहे. सध्या रुग्णालयाच्या मंजूर पदाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. कोरोनानंतर रिक्त पदे भरण्यात येत असल्याने रुग्णांना दिलासा मिळला. मात्र एकाच क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक अधिक झाल्याने अनेक विभागांना मंजूरी असूनही बंद ठेवली आहेत. सध्या आयजीएम रुग्णालयामध्ये २०० बेडच्या आकृती बंधाप्रमाणे २१८ पदे मंजूर आहेत. त्यामधील १४६ कर्मचारी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. यामध्ये कान नाक घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, भूल तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, या वैद्यकीय अधिकाऱ्‍यांच्या नेमणूक केल्या आहेत. अद्याप ७० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अधिकतर अ वर्ग व वर्ग ४ चा समावेश आहे. ३०० बेड मंजुरीमुळे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मिळतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीपीआरनंतरचे मोठे शासकीय रुग्णालय म्हणून आयजीएम रुग्णालयाकडे पहिले जाते. सध्या रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू असून खाजगी मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयाचे रूप धारण करत आहे. त्यातून रुग्णालयामध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २४ बेडचा सर्व सुविधा असलेला आतिदक्षता विभाग, ७५ बेडचे ट्रामा केअर सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र अत्याधुनिक उपकरणे हाताळणारे कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. बेडच्या मंजूरीमुळे अपुऱ्‍या कर्मचाऱ्‍यांची समस्या मार्गी लागेल असे सांगण्यात येत असल्याने रुग्णांना उपचारासाठी परगावी जावे लागणार नाही.
-----
जळीत विभाग सुरू होणार ?
आयजीएम अत्याधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असताना रुग्णालयात सर्जन नसल्याने बर्न वार्ड ( जळीत विभाग ) मंजूर असताना बंद ठेवला आहे. जळीत विभागास आवश्यक आस्थापना न भरल्याने हा वार्ड सुरू झाला नाही. रुग्णालय प्रशासनाकडूनही यासंदर्भात पाठपुरवठा होताना दिसत नाही. रुग्णालय पालिकेच्या मालकीचे असताना जळितांच्या उपचारासाठी प्राथमिक वार्डची व्यवस्था केली होती. ३०० बेड मंजुरीने हा विभाग ही सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.
----
नव्याने भारती होणारे कर्मचारी दृष्टीक्षेप
अ वर्ग-१*
वैद्यकीय अधिकारी -१*
सुश्रुषा विभाग, वर्ग ३- ४४*
तांत्रिक वर्ग -१२*
प्रशासकीय विभाग -६*
वर्ग ४- ८८*
एकूण - १५२