
स्वामी समर्थ जयंती उत्साहात
स्वामी समर्थ जयंती उत्साहात
इचलकरंजी, ता. २३ : हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात येथील स्वामी समर्थ सेवा व अध्यत्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव उत्साहात साजरी केली. यानिमित्त दिवसभरात विविध अध्यत्मिक सेवा केल्या.
नदीवेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक केंद्रात सकाळी आठ वाजता भुपाळी आरतीने उत्सवाला प्रांरभ झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीवर शोडषोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्रीस्वामी याग झाला. साडेदहा वाजता नैवेद्य आरतीनंतर भाविक सेवेकऱ्यांनी मांदीयाळीचा (सामुदायीक सहभोजन) आंनद घेतला. दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तीक सेवा केली. सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या आरतीने उत्सवाची सांगता झाली. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिडोंरी प्रणित) नदी वेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती केली.