इचल : इंजिनिअरींग कार्यशाळा

इचल : इंजिनिअरींग कार्यशाळा

ich232
इचलकरंजी ः इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे सीए श्रीरंग तांबे यांची कार्यशाळा झाली. यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित पदाधिकारी.
....
इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे कार्यशाळा उत्साहात
इचलकरंजी, ता.२३ ः इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे ‘उद्योगांचे आर्थिक व्यवस्थापन आणि मशिनरी भाडेपट्टी’ या विषयावर कार्यशाळा झाली. ओरिगा डॉट.मार्केट (मुंबई) कंपनीचे कार्यकारी संचालक सीए श्रीरंग तांबे यांनी कार्यशाळेत चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. कार्यशाळा शंकरराव दाजी कुलकर्णी उद्योग भवनमध्ये झाली. उपाध्यक्ष महेश दाते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सचिव विक्रम बुचडे, खजिनदार मिलिंद बिरादार, संचालक काशीनाथ जगदाळे, अमोद कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, अभिजित सातपुते, कुणाल जगदाळे, धनंजय भाटले, शिवाजी लोखंडे, रोहन कुलकर्णी, विनायक बिडकर, ओरिगा कंपनीचे विनोद देवताळे आदी उपस्थित होते. मानद सचिव राहुल सातपुते यांनी आभार मानले. कार्यशाळेस इचलकरंजी, हातकणंगले व जयसिंगपूर परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com