Thur, June 1, 2023

सिद्धेश्वर यात्रेत सुट्या पैशांची चणचण
सिद्धेश्वर यात्रेत सुट्या पैशांची चणचण
Published on : 24 March 2023, 12:48 pm
सिद्धेश्वर यात्रेत सुट्या पैशांची चणचण
जयसिंगपूरः ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सुट्या पैशांच्या ठणठणाटामुळे विविध व्यावसायिकांसह नागरीकांना आनंदाला मुरड घालावी लागत आहे. सुठ्ठ्या पैशाची विचारणा करुनच ग्राहकांना पाळणे आणि खाद्यपदार्थ दिले जात आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवसापासून सुट्या पैशाची चणचण भासू लागल्याने विक्रेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनात तीन वर्ष यात्रेचे आयोजन केले नाही. दोन वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या प्रमाणात श्रींचे दर्शन आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. २१ ते २६ याकाळात यात्रा भरवली आहे. मंगळवारी यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच सुट्या पैशांची चणचण भासत होती.