पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त
पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

sakal_logo
By

मनपाडळेत सेंट्रिंग कामगारास
तरुणांकडून बेदम मारहाण
कोल्हापूर ः मनपाडळे ते पारगाव (ता. हातकणंगले) रोडवर आयटीआय कॉलेजजवळ १५ ते २० तरुणांनी सूर्यकांत संजय सूर्यवंशी (वय ३०, रा. मनपाडळे) या सेंट्रिंग कामगाराला बेदम मारहाण केली. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमी सूर्यकांत याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
सूर्यकांत हा गुरुवारी सकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरून सेंट्रिंग कामासाठी निघाला होता. पारगाव रोडवरील शाळेजवळ पोहोचताच काही तरुणांनी दुचाकी थांबवून सूर्यकांतला त्याच्या वडिलांसमोरच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून पाहून संजय सूर्यवंशी आणि काही नागरिकांनी धाव घेत मारहाण करणाऱ्या तरुणांना पिटाळून लावले. याबाबत तक्रार देण्यासाठी पेठवडगाव पोलिस ठाण्यात गेल्यानंतर जखमी सूर्यकांत याला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर पारगाव येथे प्रथमोपचार घेऊन त्याला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सीपीआर पोलिस चौकीतून देण्यात आली.
.....
कारंडेवाडीत जागेच्या वादातून दाम्पत्याला मारहाण
कोल्हापूर ः माणगाववाडी पैकी कारंडेवाडी (ता. शाहूवाडी) येथे परड्यातील जागेच्या वादातून शेजाऱ्यांनी दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी नऊच्या सुमारास घडली. यात अनिल किसन जाधव (वय ३८) आणि लता अनिल जाधव (वय ३०, दोघेही रा. माणगाववाडी पैकी कारंडेवाडी) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
.....
आंबेवाडी चौकातील अपघातात दोघे जखमी
कोल्हापूर ः कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी (ता. करवीर) चौकात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. काल (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. मोहम्मद मुशाद्दीन (वय २३, रा. सीतारामपूर, उत्तरप्रदेश) आणि दीपक पांडुरंग पाटील (वय २२, रा. पन्हाळा) हे दोघे जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
....