जिल्‍हा परिषदेचा आज अर्थसंकल्‍प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषदेचा आज अर्थसंकल्‍प
जिल्‍हा परिषदेचा आज अर्थसंकल्‍प

जिल्‍हा परिषदेचा आज अर्थसंकल्‍प

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेचा आज अर्थसंकल्‍प
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.२३: जिल्‍हा परिषदेचा अर्थसंकल्‍प गुरुवारी (ता.२३) सादर होणार आहे. प्रशासकीय काळातील हा दुसरा अर्थसंकल्‍प आहे. जिल्‍हा परिषदेवर प्रशासकीय कारकीर्द येवून वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वर्षभरातील अनुभव, गरजा, सूचनांचे प्रतिबिंब अर्थसंकल्‍पात असणार का, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.
अधिकाऱ्यांनी केलेल्या फिरतीच्या माध्यमातून त्यांना जाणवणाऱ्या अडचणी, लोकांच्या गरजा, शाळेच्या दृष्‍टीने गुणवत्ता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, आरोग्यच्या सुविधाबाबत असणाऱ्या गरजा या सर्व गोष्‍टींना अर्थसंकल्‍पात स्‍थान मिळणे आवश्यक आहे. सभागृह कार्यरत असताना अनेक योजना घेता येत नसल्याची तक्रार अधिकारी करत होते. मात्र, आता प्रशासनाच्या दृष्‍टीने आवश्यक योजना राबवण्यात काहीही अडचण नाही. त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्‍पावर प्रशासनाचा पगडा राहणार आहे.
सभागृह असताना त्यांचा लोकप्रिय योजनांसह रस्‍ते, गटर्स, रंगरंगोटी आदी कामावर भर होता. त्यामुळे चांगल्या योजना राबवणे अशक्य असल्याचे अधिकारी सांगत होते. त्यामुळे प्रशासकीय काळात कोणत्या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे, हे गुरुवारी स्‍पष्‍ट होणार आहे. नाविण्यपूर्ण योजना, विभागांकडून घेतल्या जाणाऱ्या वैयक्‍तीक लाभाच्या योजना, सार्वजनिक हिताच्या कोणकोणत्या योजना घेतल्या आहेत, या योजनांवर प्रशासनाची छाप आहे की अन्य कोणाची, हे गुरुवारी स्‍पष्‍ट होईल.