केएमटी अंदाजपत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी अंदाजपत्रक
केएमटी अंदाजपत्रक

केएमटी अंदाजपत्रक

sakal_logo
By

केएमटी घेणार
पाच इलेक्ट्रिक बस
चार्जिंग स्टेशनही उभारणार; १३ सीएनजी घेण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर, ता. २३ ः जुन्या बस एक एप्रिलपासून बंद होणार असल्याने विविध माध्यमातून नवीन बस घेण्याचे नियोजन महापालिका परिवहन उपक्रमाने (केएमटी) अंदाजपत्रकात केले आहे. पाच इलेक्ट्रिक बससाठी तरतूद असून सीएनजीच्या १३ बस घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वर्षात ८५ बस मार्गस्थ राहतील, असे नियोजन केले आहे. टेंबलाई नाक्याजवळील आरक्षित जागेवर ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभे केले जाणार आहे.
केएमटी प्रशासनाने ८० कोटी १८ लाख जमेचे तर ८० कोटी १५ लाख खर्चाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यंदाच्या अंदाजपत्रकात नवीन बस घेण्याचे मोठे नियोजन केले आहे. स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाच इलेक्ट्रिकल बस घेण्यासाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. १३ सीएनजी बस घेण्यासाठी १५ कोटींची शासनाकडे मागणी करणार आहे. याशिवाय आमदारांच्या निधीतून नऊ वातानुकूलित बस ताफ्यात येणार आहेत. या पद्धतीने बसची संख्या वाढवण्याचे नियोजन केले आहे. नव्या बस घेण्याबरोबरच महिला प्रवाशांसाठी बसमध्ये पॅनिक बटन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ट्रॅकिंग सिस्टिमही बसवण्यात येणार असून त्यासाठी २५ लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे. नवीन इलेक्ट्रिकल बस येणार आहेत, त्याबरोबरच खासगी वाहनांसाठीही टेंबलाई उड्डाणपुलजवळील आरक्षित जागेवर व्यापारी तत्वावर चार्जिंग स्टेशन उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.
याशिवाय चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञ संस्थेमार्फत देण्याचे नियोजन केले आहे. बसची स्थिती तसेच वेळापत्रक दाखवणारी एक कोटीची यंत्रणाही घेतली जाणार आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी शिरोली एमआयडीसीतील प्लॉट विकसित करण्यात येणार आहे.
------------------
महसुली जमा*रक्कम*महसुली खर्च*रक्कम
प्रवासी वाहतूक*३४ कोटी३७ लाख*वेतनावर खर्च*३५ कोटी ४२ लाख
इतर बाबींचे उत्पन्न*११ कोटी७१ लाख*इंधन, देखभाल खर्च*२४ कोटी ८५ लाख
ई बससाठी महिला, बालकल्याणकडून निधी*५ कोटी*मनपा परतफेड*१७ कोटी १८ लाख
नवीन बससाठी शासन अनुदान, कर्ज उभारणी*५ कोटी२० लाख*-*-
मनपा अर्थसहाय्य*१५ कोटी*-*-
पोषण सरचार्ज*३६ लाख ८९ हजार*-*-