
राजाराम निवडणूक
`राजाराम’साठी गुरूवारी ३१ अर्ज दाखल
३० अर्जांची विक्री ः महिला प्रतिनिधी गटात चार अर्ज
कोल्हापूर, ता. २३ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर ३० अर्जांची विक्री झाली. आजअखेर ४९ जणांचे अर्ज दाखल झाले असून, सोमवार (ता. २७) हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्या (ता. २४) अर्ज भरण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.
आज अर्ज दाखल केलेल्या प्रमुखांत संचालक प्रशांत तेलवेकर, हंबीर वळके, भगवान किडगांवकर, संभाजी शंकर पाटील, शामराव तिबिले, विजय रामकृष्ण चव्हाण, गोविंद दादू चौगले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील आदींचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी गटातून आज पहिल्यांदा चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. त्यात कल्पना भगवानराव पाटील, जयश्री सुर्यकांत पाटील, मिनाक्षी भास्कर पाटील, इंदूबाई शामराव तिबिले यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होत असून, १२ एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.