गळीत हंगाम तोडणी वाहतूक करार सुरू

गळीत हंगाम तोडणी वाहतूक करार सुरू

ajr232.jpg.....
गवसे (ता. आजरा) ः येथील आजरा कारखान्याच्या वहातुक करार सुरवातप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे. यावेळी संचालक मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, अनिल फडके, प्रभारी शेती अधिकारी विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
-----
गळीत हंगाम तोडणी वाहतूक करार सुरू   
आजरा साखर कारखाना; चार लाख ५० हजार गाळपाचे उद्दिष्ट
आजरा, ता. २३ ः आजरा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३- २४ च्या गळीत हंगाम सुरु करण्यासाठी तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करण्यास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात केली.
कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करावयाचे झाल्यास कारखान्यास सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्याने मागील हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणेचा विचार करून येत्या हंगामात चार लाख ५० हजार ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस गाळपासाठी आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे जरूरी असल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे म्हणाले, ‘कारखान्याचा निवडणुक कार्यक्रम सुरू झाला असला तरी कारखान्याचे कामकाज व्यवस्थीत सुरु ठेवून पुढील काळात कारखाना लवकर सुरू करण्यासाठी नियोजन करत आहोत. कारखाना सध्या कमी दिवसांत जास्त गाळप करणे आता जरुरीचे झाले आहे. तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील आपला ऊस लवकरात लवकर जावे अशी अपेक्षा असते त्यामुळे सक्षम यंत्रणा उभी करणे हे अत्यंत जरुरीचे आहे.’ कारखान्याचे संचालक मुकुंदराव देसाई, एम. के. देसाई, अनिल फडके, प्रभारी शेती अधिकारी विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com