
चालकांचा लाखो रुपयांचा ''ओव्हरटाईम''चर्चेत
चालकांचा लाखो रुपयांचा ‘ओव्हरटाईम’ चर्चेत
-
आरोग्य विभागामधील प्रकार
कोल्हापूर, ता.२५ : जिल्हा परिषदेतील अनेक चालकांचा ओव्हरटाईम चर्चेत आला आहे. आरोगय विभागातून नुकतीच चालकांची बिले सादर केली आहेत. यात वर्षभरात लाख रुपयांचे ''ओव्हरटाईम''चे बिल सादर केले आहे. कोराना गेल्यानंतरही कोविड सेंटरना भेटी दाखविल्या आहेत. काही कंत्राटी अधिकाऱ्यांनीही फिरतीचा विक्रम केला आहे. सरकारी कामापेक्षा खासगी कामाला प्राधान्य देणाऱ्या कंत्राटी अधिकाऱ्यांना काही खातेप्रमुखांचे अभय असल्याची चर्चाही सुरू आहे.
जिल्हा परिषदेतील चालकांना ओव्हरटाईमची तरतूद आहे. सुटीच्या दिवशी काम केलेल्या प्रत्येक तासाला ओव्हरटाईम दिला जातो. आरोग्य विभागातील काही चालकांनी वर्षभर शनिवारी, रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत कामावर हजेरी लावल्याची नोंद फिरती डायरीत केली आहे. या ओव्हरटाईमसाठी वर्षाला एक लाखाहून अधिकची रक्कम या चालकांना द्यावी लागणार आहे. जवळपास दर महिन्याला १० हजार रुपये जादाची रक्कम ओव्हरटाईम म्हणून द्यावी लागणार आहे. या फिरतीला आक्षेप घेतले आहेत. सुट्टीच्या दिवशी १२ तास फिरती कशासाठी केली? प्रत्येक सुट्टीला फिरती करण्याचे कारण काय? सुट्टीच्या दिवशी फिरती करणारे अधिकारी इतर दिवशी काय करत होते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
.......
खोटी फिरती सादर करून दबाव
एका चालकाने खातेप्रमुखाला ओव्हरटाईमसह बिल सादर केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने आपण कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक फिरलोच नसल्याने बिलावर सही करण्यास नकार दिला. यावेळी बढाईखोर चालकाने विविध माध्यमांतून अधिकाऱ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा आहे
...
दर महिन्याला १० हजार ओव्हरटाईम
काही चालक हे पदाधिकारी असताना ठरवून महिन्याला १० हजार रुपये ओव्हरटाईम घेत होते. पदाधिकारी राहणार शहरात, फिरणार शहरात आणि फिरती चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत दाखवून पैसे उकळले असल्याची चर्चा आहे ओव्हरटाईमप्रमाणेच काही चालकांच्या कथा तर फारच ''सुरस'' आहेत. मात्र, काही प्रामाणिक कर्मचारी या सर्व भानगडबाजांपासून चार हात दूर आहेत.