चित्पावन संघ दिनदर्शिका

चित्पावन संघ दिनदर्शिका

90973
कोल्हापूर ः चित्पावन संघातर्फे हिंदू नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच झाले. या वेळी सुबोध गद्रे, प्रसाद भिडे, संजीव चिपळूणकर, नंदकुमार मराठे आदी.

चित्पावन संघातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन
कोल्हापूर ः येथील कोल्हापूर चित्पावन संघातर्फे हिंदू नववर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन दामोदर शिवराम आणि कंपनीचे सुबोध गद्रे यांच्या हस्ते झाले. भिंतीवर अडकवण्याची बहुतेक सर्व कॅलेंडर ही इंग्रजी महिन्याप्रमाणे असतात. त्यामुळे मराठी महिन्यांची ओळख तसेच तिथी, नक्षत्र या गोष्टी हळूहळू विस्मरणात जात आहेत. हे लक्षात घेऊन चैत्र- वैशाख याप्रमाणे प्रामुख्याने मराठी महिन्यांची दिनदर्शिका असावी, अशी संकल्पना कला कल्पना या जाहिरात संस्थेचे संजीव चिपळूणकर यांनी मांडली. कोल्हापूर चित्पावन संघाने त्याला प्रतिसाद दिला. प्रतिपदा ते अमावस्या अशा स्वरूपाची ही दिनदर्शिका गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित केली.
चित्पावन संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, उपाध्यक्ष प्रसाद भिडे, संचालक प्रसाद खाडिलकर, खजिनदार विकास परांजपे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावर्षी अधिक श्रावण महिना असल्याने ही दिनदर्शिका तेरा पानी झाली आहे. गुरु महाराज वाड्याजवळ तुळजाभवानी संकुल येथील चित्पावन संघाच्या ऑफिसमध्ये ती उपलब्ध आहे. चित्पावन संघाच्या सभासदांना ती मोफत उपलब्ध होणार असल्याचे प्रसाद भिडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com