पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक
कोल्हापूर, ता. २३ ः दसरा चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी आणलेल्या सळ्या, स्लॅबच्या पेटासह अन्य बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या तीन महिलांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज अटक केली.
याप्रकरणी रेकॉर्डवरील नम्रता संतोष गायकवाड, अश्‍विनी दत्ता नाईक व भिंगरी अविनाश सकट (तिघीही रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्या महिलांची नांवे आहेत.
पुनित युवराज ओसवाल (रा. तोरणानगर) यांच्या मालकीच्या दसरा चौकातील पार्श एंटरप्राईजेस या दुकानाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणाहून १८ फेब्रुवारीला काही बांधकाम साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद ओसवाल यांनी दिली होती. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने राजेंद्रनगर परिसरात फिरून चौकशी केली असता या तीन महिलांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला २७ हजार रूपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली. फौजदार इक्बाल महात, हेडकॉन्स्टेबल संजय कोळी, गजानन परीट, सुहास पाटील आदींनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com