महिला महाराष्ट्र केसरी

महिला महाराष्ट्र केसरी

३१०७०
सांगली ः जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी सुरू असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात निकिता सोनवणे (जळगाव) व पल्लवी सुपन्नवर (सोलापूर) यांच्या लढतीतील चुरशीचा क्षण.

३१०६९
ॅसांगली ः पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पहिली कुस्ती जोडताना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील. शेजारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गीता सुतार, हिंदकेसरी दीनानाथसिंह, बाळासाहेब लांडगे, संयोजक नामदेवराव मोहिते आदी.
........................................................

सांगलीची प्रतीक्षा बागडी उपांत्य फेरीत

पहिल्या दिवशी ६८ लढतींचा थरार; पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्‍घाटन

अजित कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २३ ः बहुचर्चित पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आज येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. स्पर्धेत राज्यभरातील ४३ संघांतील ३१० खेळाडू महिलांनी सहभाग घेतला आहे. सायंकाळी उद्‍घाटनानंतर विविध वजनगटातील ६८ लढती झाल्या. रात्री उशिरा झालेल्या खुल्या गटातील लढतीत वैष्णवी कुशाप्पा (पुणे), वैष्णवी पाटील (कल्याण), अमृता पुजारी (कोल्हापूर) व प्रतीक्षा बागडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. अमृता व प्रतीक्षा यांच्या विजयाने सांगली व कोल्हापूरची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी दावेदारी कायम राहिल्याचे चित्र आहे.
सायंकाळी जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे उपस्थित होते. नगर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, चंद्रपूर, नागपूर येथील महिला कुस्तीपटूंनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केले.

विविध गटातील निकाल असा ः
५० किलो वजनगट ः रुपाली मानावकर (नागपूर) वि. वि. भूमिका खंडा (रायगड), श्रेया मांडवे (सातारा जिल्हा) वि. वि. दुर्गा श्रीशांत(नगर), सलोनी ठसाले (रत्नागिरी) वि. वि. तनुजा डोईफोडे (पुणे जिल्हा)
५५ किलो वजनगट ः शहनाज शेख (सातारा) वि. वि. शीतल खरात (ठाणे जिल्हा), अंजली गजभिये (नागपूर शहर) वि. वि. स्वाती गवळी (रत्नागिरी), विश्रांती पाटील (कोल्हापूर शहर) वि. वि. नेहा मडके (सांगली), ऐश्वर्या सणस (ठाणे जिल्हा) वि. वि. सोनमिका पाटील (जळगाव).
५७ किलो वजनगट ः स्मिता पाटील (कोल्हापूर जिल्हा) वि. वि. सिमरन कोरी (मुंबई पूर्व), अंकिता जाधव (सोलापूर जिल्हा) वि. वि. लतिका कोळी (जळगाव), सोनाली मंडलिक (नगर) वि. वि. ऋतुजा पवार (सातारा).
५९ किलो वजनगट ः तनया (धुळे) वि. वि. प्रतीक्षा जमादार (नागपूर शहर), अनुश्री बाबर (सोलापूर शहर) वि. वि. मोनिका कदम (ठाणे शहर), श्रध्दा कुंभार (सोलापूर शहर) वि. वि. साक्षी (पुणे शहर).
६२ किलो वजनगट ः भारती भुजबळ (नाशिक) वि. वि. पूजा नागे (सांगली), श्रृंखला (छत्रपती संभाजीनगर) वि. वि. मयुरी राठोड (मुंबई पूर्व), प्रगती वाघ (धुळे) वि. वि. प्रियांका मोटे (जळगाव)
..................................
चौकट
खुल्या गटात अनेकींची प्रतिस्पर्ध्याला चाल
काही कुस्तीपटूंनी पंचांचा निर्णय अमान्य केल्याने वाद झाले. खुल्या गटात ६५ ते ७६ किलोदरम्यान वजनी गट निश्चित करण्यात आला आहे. त्यात १७ कुस्तीगीरांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात जवळपास १५ कुस्तीगीरांनी प्रतिस्पर्ध्याला चाल दिल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी फक्त दोघीच प्रत्यक्ष खेळण्यासाठी उपस्थित राहिल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, शुक्रवारी त्यांची संख्या वाढणार असल्याचा दावा संयोजकांनी केला.
------------------------------
चौकट
दिल्लीत दाखवा; महाराष्ट्रात काय काम?
हिंदकेसरी दीनानाथ सिंह उद्‍घाटनानंतर म्हणाले, कुस्तीगीर परिषद व अस्थायी समिती यांच्यातील वाद नाहक सुरू आहे. कुस्तीच्या विकासासाठी परिषदेचे अमूल्य योगदान आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून अस्थायी समितीचा बागुलबुवा उभा केला आहे. ‘काय करायचे आहे ते दिल्लीत दाखवा, महाराष्ट्रात उगाच ढवळाढवळ करू नका’, असे प्रतिपादन केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना समर्थन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com